सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सिंधुदुर्ग येथील अब्दुल हमीदच्या मालकीचा अनाधिकृत गादी कारखाना भुईसपाट; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केली कारवाई

ओरोस येथील मुख्य वीजवाहिनीच्या खाली महामार्गाला लागून ओरोस बुद्रुक सर्वे क्रमांक ३७ हिस्सा क्रमांक ३३ या क्षेत्रामध्ये अब्दुल हमीद याने हे अनाधिकृत बांधकाम केले होते.

Sudarshan MH
  • Mar 14 2025 9:36AM

सिंधुदुर्ग: मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गवर ओरोस येथे प्रशासनाची अनुमती न घेता बांधलेला बेकायदेशीर गादी कारखाना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पोलीस बंदोबस्तात बुलडोझरने भुईसपाट केला आहे. अब्दुल हमीद सुबराती याच्या मालकीचा हा कारखाना वाहतुकीस अडथळा ठरत होता, तसेच तो धोकादायकही होता. अब्दुल हमीदने ग्रामपंचायत, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नगररचना कार्यालय आणि महसूल विभाग यांची कोणतीच अनुमती न घेता कायद्याला धाब्यावर बसवून हा कारखाना बांधला होता. ओरोस येथील मुख्य वीजवाहिनीच्या खाली महामार्गाला लागून ओरोस बुद्रुक सर्वे क्रमांक ३७ हिस्सा क्रमांक ३३ या क्षेत्रामध्ये अब्दुल हमीद याने हे अनाधिकृत बांधकाम केले होते.

 
या कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात गादी आणि फर्निचर यांचे उत्पादन केले जात होते. फर्निचर आणि गाद्या यांची खरेदी करण्यासाठी कारखान्यात येणारे ग्राहक महामार्गावरच त्यांची वाहने उभी करत असत. महामार्गाचा हा भाग वळणाचा असल्याने येथे धोकादायक स्थिती निर्माण झाली होती, तसेच महामार्गावर अनेक अपघात झाले होते. ओरोस बुद्रुक ग्रामपंचायतीने अब्दुल हमीद याला नोटीस पाठवूनही त्याने अवैध बांधकाम हटवले नाही. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कारवाई केली आहे. येथे मोठ्या प्रमाणात असलेले फर्निचर आणि गाद्या आदी सामान १३ मार्च या दिवशी बाहेर काढून नंतर कारखान्याची इमारत पाडण्यात आली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार