नंदुरबार जिल्ह्यात पोलीस अधीक्षक श्री पी आर पाटील यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन अक्षता हा उपक्रम जिल्हा पोलीस दला तर्फे सुरू करण्यात आला
उपक्रम जिल्हा पोलीस दला तर्फे सुरू करण्यात आला
नंदुरबार :(प्रतिनिधी) नंदुरबार जिल्ह्यात पोलीस अधीक्षक श्री पी आर पाटील यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन अक्षता हा उपक्रम जिल्हा पोलीस दला तर्फे सुरू करण्यात आला आहे दिनांक १२ जून २०२३ रोजी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक बी आर पाटील यांना माहिती मिळाली होती की धडगाव पोलीस ठाणे अंतर्गत येणारा पाडली चा बोरलीपाडा गावात १३ जून व १४ जून २०२३ रोजी एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा चांदसैली येथील तरुणाशी बालविवाह होणार आहे सदरची माहिती पोलीस अधीक्षक श्री पी आर पाटील यांनी धडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ईशामुद्दिन पठाण यांना कळवून सदरचा बालविवाह थांबून अल्पवयीन मुलीच्या पालकांचा समावेशन करण्याबाबत आदेशित केले होते या आदेशान्वये धडगाव पोलीस निरीक्षक ईशामुद्दिन पठाण आपल्या पथकासह अक्षता सेलच्या सदस्यांच्या मदतीने माहिती काढत पाडलीचा बोरलीपाडा गावातील एका अल्पवयीन मुलीचा चांदसैली येथील तरुणाशी बालविवाह होणार असल्याची माहिती प्राप्त झाली १३ जून व १४ जून २०२३ रोजी हा बालविवाह होणार असल्याचे समजले परंतु यापूर्वीच गावातील नागरिक व त्यांच्या कुटुंबीयांना कायदेशीर बाबी समजावून त्यांचे समुपदेशन करून त्यांना बालविवाह करण्यापासून परावृत्त केले तसेच अल्पवयीन मुलीच्या व मुलाचे पालक व गावातील नागरिकांचा समुपदेशन करून मन परिवर्तन केलं याबाबत अल्पवयीन मुलीच्या व मुलाच्या पालकांना धडगाव पोलीस ठाण्याकडून कायदेशीर नोटीस देखील बजाविण्यात आली आहे
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प