सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सुसंस्कारित कुटुंबासाठी महिलांनी जपानुष्ठान परंपरेत सहभागी व्हावे; अनंत विभूषित महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचे प्रतिपाद

ओझर येथे आयोजित महिला जपानुष्ठान सोहळ्याचा महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अनंत विभूषित श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी केले.

Sudarshan MH
  • Sep 12 2024 10:24PM
ओझर: आई आपल्या संपूर्ण कुटुंबाला सुसंस्कारित करू शकते.कारण आई हीच प्रत्येकाची प्रथम गुरु असते. संस्कार आणि संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी महिला मातांची महत्त्वाची भूमिका असते.यामुळेच सुसंस्कारित कुटुंबासाठी महिलांनी जपानुष्ठान करणे गरजेचे आहे. ओझर येथे आयोजित महिला जपानुष्ठान सोहळ्याचा महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अनंत विभूषित श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी केले.
 
कठोर तपस्वी निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या मातोश्री जगदमाऊली म्हाळसामाता तसेच उत्तराधिकारी अनंत विभूषित महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या मातोश्री जगदमाऊली फुलामाता यांच्या संयुक्त पुण्यतिथी सोहळ्याचे ओझर येथे २२ ते २७ सप्टेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.त्यानिमित्त खास महिला सक्षमीकरणासाठी जपानुष्ठान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्यात महिलांनाच संधी देण्यात आली आहे या सोहळ्याचे ध्वजारोहण फटाक्यांच्या आतिषबाजीत,सनईच्या निनादत, पुष्पवृष्टी करत, जय बाबाजी, जय म्हाळसामाता,जय फुलामाता अशा प्रचंड जयघोषात करण्यात आले.प्रारंभी सवाद्य पालखी मिरवणूक संपन्न झाली. यानंतर जगदगुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या पवित्र पालखीचे व पादुकांचे पूजन तसेच संत-अतिथी-ब्राह्मण पूजन संपन्न झाले.यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना अनंत विभूषित महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज म्हणाले की,भारतीय संस्कृतीत अनेक महान माता होऊन गेल्या.त्या मातांच्या केवळ नामस्मरणानेच महापापांचा नाश होतो.त्या पंचकन्यांचे रोज स्मरण करा,सती अनुसया मातेने एका संकल्पात त्रिदेवांना बालरूप केले. अंजनी मातेने अनुष्ठान करून हनुमंतराया सारख्या महावीर पुत्ररत्नास जन्म दिला.तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता याप्रमाणे सती सवित्रीची एकनिष्ठ पतीभक्तीचे मोठे उदाहरण आहे. पूर्वी ऋषीमुनी हेच अनुष्ठान करत असत.मात्र जगदगुरु जनार्दन स्वामी महाराज यांनी 'जप तप अनुष्ठान करिती ऋषी,मुनी,जन' या धर्म ग्रंथातील 'जन' या वाक्य नुसार जनसामान्यासाठी अनुष्ठानाची दिव्य परंपरा खुली केली.महिलांनी आपल्या कुटुंबाला सुसंस्कारित करण्यासाठी जपानुष्ठान परंपरेत सहभागी व्हावे असे सांगितले. मुलांनां चांगले संस्कार देण्यासाठी आईची मोठी भूमिका असते.त्यासाठी महिलांनी अनुष्ठान करणे गरजेचे आहे असेही अनंत विभूषित श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांनी सांगितले. जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने मातोश्री म्हाळसा माता व मातोश्री फुलामाता यांच्या संयुक्त पुण्यतिथी निमित्त ओझर येथील देवभूमी जनशांती धाम येथे २२ ते २९ सप्टेंबर दरम्यान महिला सक्षमीकरणासाठी खास महिला साधकांसाठी जपानुष्ठान,अखंड नंदादीप,महायज्ञ,हस्तलिखित नामजप महाअभिषेक यांसह विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्या दरम्यान रोज पहाटे ५ वाजता नित्य नियम विधी,आरती,सत्संग,प्राणायाम,ध्यान,
प्रवचन,महिला संस्कार मार्गदर्शन आदी अनेकविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहे.ध्वजारोहण सोहळ्या प्रसंगी स्वरसिंधुराचे संचालक राहुल शिंदे यांनी सुमधुर भक्ती गीते सादर करून भाविकांना मंत्र मुग्ध केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार