नेवासा: अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा शहरामधील शेंडे गल्ली भरावजवळील काटवनामध्ये कत्तल करण्यासाठी आणलेल्या १७ गायी, ६ गोवंशीय कालवडी आणि ४ गोवंशीय गोर्हे यांची सुटका करण्यात आली. या गोवंशीय जनावरांचे बाजारभावाने १३ लाख ४० सहस्र रुपये एवढे मूल्य निर्धारित होते. या प्रकरणी जिहादी नदीम चौधरी, फिरोज अन्सारी देशमुख, शोएब खाटीक, खलील चौधरी, अबू चौधरी, मोजी चौधरी, जबी चौधरी, अन्सार चौधरी आणि अकील चौधरी अशा ९ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. २ जानेवारी या दिवशी ही कारवाई करण्यात आली होती.
अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेले आहेत. त्यानुसार नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसायांची माहिती गोळा करण्यात येत आहे. त्या वेळी पोलिसांच्या गुप्तहेरांकडून काटवनात गोवंशीय जातीची जिवंत जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवलेली असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पंचांसमवेत पोलीस पथक काटवनामध्ये गेले. पोलीस अधिकारी येत असल्याचे पाहून सर्व जिहादी जनावरांना सोडून पसार झाले.