विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री डॉ.रविन्द्रनारायण सिंह १२ डिसेंबर रोजी नागपूरात
विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री डॉ. रविन्द्रनारायण सिंह यांचे नियुक्ती नंतर प्रथमच दिनांक ११ डिसेंबर रोजी सायंकाळी नागपूर शहरात आगमन होणार आहे.
नागपूर - विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री डॉ. रविन्द्रनारायण सिंह यांचे नियुक्ती नंतर प्रथमच दिनांक ११ डिसेंबर रोजी सायंकाळी नागपूर शहरात आगमन होणार आहे. डॉ . रवींद्रनारायण सिंह हे प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन असून चिकित्सा विज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल भारत सरकार द्वारा सन 2010 रोजी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आहेत, बिहार, पश्चिम बंगाल, ओडीसा राज्यात प्रसिद्ध ऑर्थोपेडिक चिकित्सक म्हणून प्रसिद्ध असलेले
डॉ.सिंह १२ डिसेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता विश्व हिंदू जनकल्याण परिषदेच्या विदर्भ प्रांत कार्यालय भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून, रेशीमबाग स्थित स्मृती मंदिर येथे दर्शन करून दुपारी विहिंपच्या विदर्भ प्रांत कार्यसमितीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत, तसेच सायंकाळी नागपूर शहरातील डॉक्टरां सोबत भेटीचा कार्यक्रम आयोजित केला असून त्यात उपस्थित राहून रात्री पटना येथे प्रस्थान करणार असल्याचे प्रांत मंत्री गोविंद शेंडे, प्रांत प्रचार प्रसार प्रमुख निरंजन रिसालदार यांनी कळविले.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प