सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

रा. स्व. संघातर्फे पिंपरी चिंचवड शहरात शनिवारी तब्बल २६ स्थानी पथसंचलन; हजारो स्वयंसेवक सहभागी होणार

यंदा संघ शताब्दी वर्षात प्रवेश करत असल्याने पथसंचलनांना एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.

Sudarshan MH
  • Oct 11 2024 1:56PM
पिंपरी - चिंचवड: राष्ट्रहित व सेवा कार्यासाठी सदैव कटिबद्ध असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दरवर्षी विजयादशमी निमित्याने शहरात पथसंचलनाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी विजयादशमी शनिवार दि.१२ ऑक्टोबर विजयादशमी रोजी पिंपरी चिंचवड शहरातील तब्बल २६ स्थानाहून विविध भागातील नियोजित मार्गावर संघ गणवेशातील स्वयंसेवकांचे सदंड भव्य पथसंचलन निघणार आहे. घोषाच्या तालावर हे संचलन होणार आहे. यंदा संघ शताब्दी वर्षात प्रवेश करत असल्याने पथसंचलनांना एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. संघ स्वयंसेवकांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रमुख अतिथी विविध भागातील संचलनात सहभागी होतील. जास्तीत जास्त नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक विनोद बन्सल यांनी केले आहे.
 
विविध भागातील पथसंचलन स्थान व वेळ -
 
*नगर : देहू*
वेळ : सायं.४.३० वाजता
स्थान : विठ्ठल मंदिर, विठ्ठलवाडी, देहू
 
 
*नगर : देहूरोड*
वेळ : सकाळी ८.३० वाजता
स्थान : व्हिडीआर मैदान, मामुर्डी 
 
*नगर : निगडी*
वेळ : सकाळी ०७:२५
स्थान : रुपीनगर, सहयोगनगर
 
 
*नगर : संभाजी नगर*
वेळ : सकाळी ७ वाजता
स्थान : विठ्ठल मंदिर समोरील मैदान, राजे शिवाजी नगर
 
*नगर : चिखली*
वेळ : सकाळी ०७:३०
स्थान : म्हेत्रे उद्यान समोर, म्हेत्रे साने वस्ती रोड, म्हेत्रे वस्ती
 
*नगर : दिघी*
वेळ - दुपारी ४.३० वाजता
स्थान : माणिक पार्क सोसायटी समोरील मैदान, बोपखेल
 
*नगर : मोशी*
वेळ : सायं.४.३०
स्थान : न्यू इंद्रायणी शाळा, शिवाजीवाडी 
 
*नगर : आळंदी*
वेळ : सकाळी ७:३० वाजता
स्थान : नानाश्री लॉन्स प्रांगण, मरकल रस्ता, आळंदी
 
*नगर : चऱ्होली*
वेळ : सायं ४.३० वाजता
स्थान : किड्स पराडाईज शाळा, काळे कॉलनी 
 
*नगर : भोसरी*
वेळ : सकाळी ७.३० वाजता
स्थान : शिवाजी महाराज विद्यालय, भोसरी
 
*नगर : इंद्रायणी नगर*
वेळ : सायं. ०४:०० वाजता
स्थान : सुंधा माता मंदिराजवळ, खान्देश नगर, इंद्रायणी नगर
 
*नगर : संत तुकाराम नगर*
वेळ : दुपारी ४.३०
स्थान : बालभवन शाळा, खराळ आई मंदिर जवळ, खराळवाडी, पिंपरी
 
*नगर : कासारवाडी*
वेळ : सकाळी ७.३० वाजता
स्थान : कुंदन नगर
 
*नगर : सांगवी*
वेळ : सकाळी ८:३०
स्थान : स्व.वसंत दादा पुतळा, शेवटचा बस स्टॉप, प्रियदर्शनी नगर, जुनी सांगवी 
 
*नगर : पिंपळे गुरव*
वेळ : सकाळी ०७:३०
स्थान : राजमाता जिजाऊ उद्यान, पिंपळे गुरव 
 
*नगर : पिंपळे सौदागर*
वेळ : सकाळी ०७:००
स्थान : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा
 
*नगर : पिंपळे निलख*
वेळ : सकाळी ०७:००
स्थान : हॉटेल रंगला पंजाब जवळ, डि. पी. रोड, विशाल नगर
 
*नगर : काळेवाडी - रहाटणी*
वेळ : सकाळी ७.१५ वाजता
स्थान : १५ एम स्ट्रीट सोसायटी शेजारी मैदान, रहाटणी मेन रोड
 
*नगर : पिंपरी*
वेळ : सकाळी ०७ वाजता
स्थान : साधू वासवानी उद्यान शेजारी, पिंपरी काळेवाडी पुलाजवळ
 
*नगर : चिंचवड पूर्व*
वेळ : सकाळी ०७:००
स्थान : झेंडा चौक जवळ, एम्पायर इस्टेट, जुना मुंबई पुणे मार्ग
 
*नगर : चिंचवड पश्चिम*
वेळ : सकाळी ६.४५ वाजता
स्थान : स्वामी समर्थ केंद्र
 
*नगर : वाकड-थेरगाव*
वेळ : सकाळी ०७ वाजता
स्थान : बापूजी बुवा उद्यान समोर, थेरगाव 
 
*नगर : पुनावळे*
वेळ : सकाळी ०७ वाजता
स्थान : स्तांझा सोसायटी समोर, पांढरे वस्ती 
 
*नगर: हिंजवडी*
वेळ: ७.३० वाजता
स्थान: संग्रीया सोसायटी गेट, मेगापोलीस, मान, हिंजवडी
 
*नगर : रावेत*
वेळ : सकाळी ०७:०० वाजता
स्थान : ओम चौक, हनुमान स्वीट, बिजली नगर
 
*नगर : आकुर्डी*
वेळ : सकाळी ०७ वाजता
स्थान : सूर्यमुखी मारुती मंदिराजवळ, काचघर चौक, सेक्टर २४, प्राधिकरण

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार