पुणे: हिंदू महिलेच्या मुलाला आणि पतीला जिवे मारण्याची धमकी जिहाद्याने दिली होती. त्याविरोधात पूर्वी पोलिसांत तक्रार केल्याचा राग त्याच्या मनात होता. पोलिसांत तक्रार केल्याच्या रागातून जिहाद्याने विवाहितेच्या घरामध्ये घुसून ब्लेडने वार केले. लाथा - बुक्क्यांनी मारहाण करत तिच्या मुलाला आणि पतीला जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी जिहादी महंमद जानी जिलानी शेख याच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जिहादी आरोपी शेख विरुद्ध २६ वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. ३ जानेवारी या दिवशी तक्रारदार महिला आपल्या २ मुलांसह घरी होती. आरोपीने दुपारी घरामध्ये शिरून त्यांना मारहाण केली. हा प्रकार घडत असतांना महिलेने आरडाओरडा केला. हा प्रकार शेजार्यांच्या लक्षात येताच त्यांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.