सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जेजुरी गडावर भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू; भारतीय वेशभूषा परिधान करण्याचे देवस्थान ट्रस्टचे आवाहन

ट्रस्टने या संदर्भात नियमावली ही घोषीत केली आहे.

Sudarshan MH
  • Mar 11 2025 11:13AM
पुणे: महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्‍या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर येणार्‍या भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. हा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे. ट्रस्टने या संदर्भात नियमावली ही घोषीत केली आहे. या वस्त्रसंहितेनुसार मंदिरात दर्शनासाठी येतांना भारतीय वेशभूषा परिधान करणे आवश्यक असेल.
 
‘भारतीय वेशभूषा असेल, तरच भाविकांना प्रवेश मिळेल, असा निर्णय श्री मार्तंड देव संस्थान, जेजुरीच्या विश्‍वस्त मंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे. पाश्‍चिमात्य कपडे परिधान करून आल्यास खंडोबांच्या दर्शनाचा लाभ घेता येणार नाही.
 
देवस्थान ट्रस्टने वस्त्रसंहितेसंदर्भात सांगितले, की पुरुष आणि महिला भाविकांना अल्प कपड्यांमध्ये प्रवेश मिळणार नाही. फॅशन म्हणून वापरण्यात येणार्‍या फाटक्या जीन्स, बरमुडा, शॉर्ट, स्कर्ट किंवा तत्सम कपडे घालून देवदर्शनास गडावर येण्यास मज्जाव केला जाईल. गुडघ्याच्यावर असणारे किंवा आखूड - कमी कपडे घालून येऊ नये.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार