सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

देशाची फाळणी करणाऱ्यांनी सावरकरांवर बोलू नये भाजप शहर आध्यक्ष जगदीश मुळीक

सावरकरानवर बोलण्याआधी राहुल गांधींनी भारतीय स्वातंत्र्य इतिहासाचा अभ्यास करावा

Deepak Chavhan
  • Oct 9 2022 2:09PM

पुणे: ज्यांच्या पूर्वजांनी देशाची फाळणी केली ते राहुल गांधी भारत जोडो यात्रा काढत आहेत. प्रत्यक्षात या यात्रेतून देश तोडण्याची भाषा केली जाते. अखंड हिंदुस्थानचे स्वप्न पाहणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधाने केली जातात. सावरकर यांच्याबद्दल बोलण्यापूर्वी राहुल गांधींनी भारतीय स्वातंत्र्य इतिहासाचा अभ्यास करावा अशी टीका भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.

काँग्रेस चे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो अभियाना दरम्यान स्वातंत्रवीर सावरकर,राष्ट्रीय स्वयंसेवक संघांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले त्याचा निषेध करण्यासाठी शहर भाजपच्या वतीने अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली सारसबाग येथील  स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले होते. या वेळी मुळीक बोलत होते. 

मुळीक म्हणाले, राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करणारी वक्तव्य केली आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आक्षेपार्ह टीका केली आहे. देशातील काँग्रेसचा जनाधार संपला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि
वीर सावरकर यांचा हिंदुत्वाच्या विचाराचा भारतीय जनतेने स्वीकार केला आहे. त्यामुळे नैराश्यातून राहुल गांधी बेताल वक्तव्य करीत आहेत. त्यांना देशात अराजकाची स्थिती निर्माण करायची आहे. आम्ही याचा निषेध करतो.

मुळीक पुढे म्हणाले, स्वातंत्र्यानंतरच्या राजकीय परिस्थितीत जाणीवपूर्वक वीर सावरकरांना अपमानित करण्याचे काम केले गेले. आम्ही सर्वच स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करतो.
पण, अंदमान कारागृहात काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेले फार थोडे आहेत. वीर सावरकरांनी अनेकांना क्रांतीची प्रेरणा दिली. राहुल गांधी यांना स्वातंत्र्याचा इतिहास माहिती नाही. आता अशा राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या स्वागताला 
राहुल गांधी यांचा शिवसेना निषेध करणार की, त्यांच्या तथाकथित भारत जोडो यात्रेच्या स्वागताला जाणार का असा प्रश्न निर्माण होतो.

शहराध्यक्ष जगदीश मुळीक, पुणे शहर सरचिटणीस गणेश घोष ,राजेश येनपुरे, दत्ताभाऊ खाडे,जितेंद्र पोळेकर प्रमोद कोंढरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार