सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; प्रेम प्रकरणातून भावानेच केली बहिणीची हत्या!

घरच्यांकडून जीवाला धोका असल्याची तक्रार मुलीने शहागड पोलिसांना दिली होती.

Sudarshan MH
  • Jan 7 2025 11:32AM

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ऑनर किलिंगची एक एक धक्कादायक हादरून सोडणारी घटना समोर आली आहे. सतरा वर्षांच्या मुलीची २०० फूट डोंगरावरुन खाली ढकलून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रेम प्रकरणातून मुलीच्या सख्ख्या चुलत भावानेच तिची हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. एका व्हिडिओतून हत्येचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

 
अंबड तालुक्यातील शहागड मुलगी घर सोडून निघून गेली होती. घरच्यांकडून जीवाला धोका असल्याची तक्रार मुलीने शहागड पोलिसांना दिली होती. त्यानंतर घरच्यांनी समजूत काढण्यासाठी मुलीला संभाजीनगरच्या वळदगाव येथे काकाच्या घरी पाठवले होते. काकाचा मुलगा ऋषिकेश याने गोड बोलून खावडा डोंगरावर गोड बोलून घेऊन गेला. त्याच डोंगरावरुन त्याने तिला खाली ढकलून दिले त्यात मुलीचा जागीचा मृत्यू झाला आहे. अल्पवयीन मुलीचे वय १७ वर्ष असं असून आरोपीचे नाव ऋषिकेश तानाजी शेरकर (वय २५) वर्ष आहे.
 
पोलिसांकडून या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे. बहिणीने दुसऱ्या जातीतील मुलाशी प्रेम केले म्हणून भावाने तिची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. दरम्यान हत्येचा हा थरार कॅमेऱ्यातदेखील कैद झाला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील या ऑनर किलिंगच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार