सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांना पराभवाचा धक्का; तर अमोल खताळ जायंट किलर

संगमनेरमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फार प्रभाव दिसला. याशिवाय हिंदुत्वाच्या मुद्द्याचाही परिणाम झालेला दिसला.

Sudarshan MH
  • Nov 24 2024 9:51AM

संगमनेर: बाळासाहेब थोरात विधानसभा निवडणुकीत मागील तब्बल ४० वर्षांपासून संगमनेर मतदारसंघातून निवडून येत होते. मात्र, या विधानसभा निवडणुकीत शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या अमोल खताळ यांनी थोरातांचा १० हजार ५६० मतांनी पराभव केला आणि ते राज्याच्या राजकारणातील जायंट किलर ठरले आहेत. अमोल खताळ यांना १ लाख १२ हजार ३८६ मते मिळाली, तर बाळासाहेब थोरात यांना १ लाख १ हजार ८२६ मते मिळाली. १९६२ पासून संगमनेर मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व राहिलं आहे. 

विधानसभा निवडणूक २०२४ जाहीर झाल्यानंतरही भाजपमध्ये असलेले अमोल खताळ ऐनवेळी शिवसेनेच्या शिंदे गटात आले आणि त्यांना संगमनेर मतदारसंघाचे तिकीट मिळाले. विशेष म्हणजे अमोल खताळ यांची कोणतीही मोठी राजकीय पार्श्वभूमी नाही. संगमनेरमध्ये राजकीय प्रतिनिधित्व हवं असलेली मोठी तरुणांची संख्या होती. त्यांनी अमोल खताळ यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडली.

संगमनेर तालुक्यातील सहकार क्षेत्रावर बाळासाहेब थोरातांचं एकहाती नियंत्रण आहे. त्यांनी तालुक्यात सहकारी साखर कारखाना, दूध उत्पादक संघ, शाळा, महाविद्यालये, इंजिनियरिंग कॉलेज, डेंटल कॉलेज, फार्मसी कॉलेज असं संस्थांचं मोठं जाळं निर्माण केलं आहे. त्यामुळे थोरातांच्या प्रचारात या सर्वच संस्थांची यंत्रणा पूर्ण ताकदीने उतरलेली दिसते. असं असतांनाही बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार