सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आम्हाला कोणीही मराठी शिकवू नये... खा.संजय राऊत

मी आता नागपूरला येणं सुरू करतोय. निवडणुका वगैरे आहेतचं, पण नागपूर आणि विदर्भात शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी नागपूर माझा तळ असेल. कालच मुख्यमंत्र्यांशी विदर्भाबाबत चर्चा झाली व विदर्भात अनेक बदल होतील, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले

Snehal Joshi .
  • Feb 21 2022 11:25PM

नागपूर :

हाराष्ट्राच्या राजकारणात  शाब्दिक वारन्यारे  सुरू आहे. संस्कार व संस्कृती अद्यापही कायम आहे. असे प्रत्येक पक्षातील नेता म्हणतो.  महाराष्ट्रातील हा वाद कायम असतानाच आज नागपूर शहरात  शिवसेनेचे खासदार संजय राऊत  म्हणाले की जे लोक महाराष्ट्रद्रोही आहेत व ज्यांना मराठी भाषेबाबत द्वेष आहे, त्यांच्याशी त्याच भाषेत बोलले पाहिजे. भाजपमध्ये काही लोक तर हजार मारावे अन् एक मोजावे असे  टीकास्त्र सोडले असून आज ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मुंबईत व महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात महाराष्ट्रद्रोही राजकीय भाषेचा बुरखा वापरून राज्यावर थुंकत असेल तर तसेच उत्तर देऊ आम्हाला कोणीही मराठी शिकवू नये, असे राऊत म्हणाले.

देशात आघाडी होणार अशी चर्चा आहे. मात्र आघाडी वगैरे शब्द बरोबर नाहीत. तिसरी,चौथी आघाडी असे प्रयोग यशस्वी झालेले नाहीत. निवडणुका आल्या की, अशा आघाडींची चर्चा होते. भविष्यातील राजकीय दिशेबाबत मुख्यमंत्र्यांची तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याशी चर्चा झाली. दोन नेते व देशातील विरोधी पक्षांतील इतर नेते लवकरच भेटणार आहेत. काँग्रेसशिवाय कुठलीच आघाडी बनणार नाही. काँग्रेसला सोबत घेतले पाहिजे हीच आमची भूमिका आहे. देशात लोकशाही संपत आहे व उत्तर प्रदेशमध्ये भाजप हरत आहे. भाजपने आम्हाला ज्ञान देऊ नये. त्यांनी त्यांचा पक्ष सांभाळावा. त्यांचा पक्ष कणाकणाने संपत आहे, असा दावा राऊत यांनी केला. काल नागपूर पोलीस आयुक्तांचीअमितेश कुमार यांची त्यांनी सदिच्छा भेट घेतली होती. कुणीही त्याचा वेगळा अर्थ काढू नये,असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.

नागपूरला मी दोन वर्षांनी आलोय, नागपुरात खूप काही बदल झालाय, अधिवेशन काळानंतर आलोय, कोविड काळात येऊ शकलो नाही, पण मी आता नागपूरला येणं सुरू करतोय. निवडणुका वगैरे आहेतचं, पण नागपूर आणि विदर्भात शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी नागपूर माझा तळ असेल. कालच मुख्यमंत्र्यांशी विदर्भाबाबत चर्चा झाली व विदर्भात अनेक बदल होतील, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार