श्रीरामपूर: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जिहादी आमीर शेखसह वडील आजीज बबन शेख आणि आई सलमा शेख यांच्या विरोधात श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिहादी आमीर हा एका अल्पवयीन मुलीला वर्ष २०२१ पासून ३ जानेवारी २०२५ पर्यंत दुचाकीवरून फिरवत होता. ती अल्पवयीन आहे, हे ठाऊक असूनही त्याने तिला अनेक आमिषे दाखवली होती
संबंधित अल्पवयीन मुलीचे छायाचित्रे आणि चित्रफीती इन्स्टाग्राम या सामाजिक प्रसारमाध्यमावर टाकून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. या कृत्यांसाठी त्याच्या आई - वडिलांनी साहाय्य केले, असे तक्रारीमध्ये दाखल करण्यात आले आहे.