हा असत्यावर सत्याचा विजय - श्वेता महाले
: चिखली विधानसभा मतदार संघात सलग दुसर्यांदा भाजपच्या श्वेता महाले यांनी यश आपल्या पदरात पाडले आहे. तर कॉंग्रेसच्या राहुल बोंद्रे यांना पुन्हा पराभवाला सामोरे जावे लागले असून हा अपयश नियोजनाच्या अभावामुळेच झाले असल्याचे आता बोलल्या जात आहे.
संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचे लक्ष चिखली मतदार संघावर लागून होते. कॉंग्रेस चे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे हे यावेळेस सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उभे होते मात्र भाजपच्या श्वेता महाले यांच्या नियोजन व राजकीय खेळी यामुळे त्यांना हि निवडणूक जिंकता आली आहे, तर हि असत्यावर सत्याचे विजय असल्याचे त्यांनी बोलून दाखवले आहे. श्वेता महाले ह्या जवळपास ३२०१ मताने येथून निवडून आल्या आहेत.
विधानसभा निवडणूक २०२४ चिखली मतदार संघात निवडून आल्यावर आपली पहिली प्रतिक्रिया देतांना श्वेता महाले यांनी सांगितले कि, असत्या वरती सत्याचा हा विजय आहे. आमच्या लाडक्या बहिणींचा हा विजय आहे, भरभरून मतदान रुपी आशीर्वाद या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणींनी, शेतकरी बांधवांनी दिला. मी आपल्या सर्वांना सगळ्यांचे आभार मानते आणि नक्की येणाऱ्या काळामध्ये अजून चांगल्या पद्धतीने या संपूर्ण चिखली विधानसभेचा कश्या पद्धतीने विकास करता येईल हयाच्यावरती आम्ही काम करू. असे त्या म्हणाल्यात.
विधानसभा मतदार संघात भाजपच्या श्वेता महाले यांना एकूण १ लाख ०९ हजार २०१२ मते मिळाली तर कॉंग्रेसचे राहुल बोंद्रे यांना ०१ लाख ०६ हजार ११ मते मिळाली. तर त्या खालोखाल गणेश बरबडे यांना ०१ हजार ३२३, सिद्धेश्वर परिहार यांना ०१ हजार ३०८, शंकर चव्हाण यांना ९७७ मते मिळाली. महायुतीचे उमेदवार श्वेता महाले हे ३२०१ मतांनी विजयी झालेल्या आहे. तर या निवडणुकीत चिखली विधानसभा मतदार संघाची एकूण मतमोजणी ०२ लाख २३ हजार ४३४ इतकी झालेली आहे.