सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कार्यकर्ता गमावणे म्हणजे कुटुंबातील मुलगा, भाऊ गमावण्यासारखे आहे. त्याची झळ संघटनेला पोहोचली म्हणून त्याच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी या आंदोलनातन करत असल्याचे विदर्भ प्रांत मंत्री गोविंद शिंदे म्हणाले.

कार्यकर्ता गमावणे म्हणजे कुटुंबातील मुलगा, भाऊ गमावण्यासारखे आहे. त्याची झळ संघटनेला पोहोचली म्हणून त्याच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी या आंदोलनातन करत असल्याचे विदर्भ प्रांत मंत्री गोविंद शिंदे म्हणाले.

Snehal Joshi .
  • Feb 23 2022 12:18AM

नागपूर शहरातील सामाजिक आणि राजकीय प्रदर्शनासाठी ऐतिहासिक महत्त्व असणारे बडकस चौक येथे आज विश्व हिंदू परिषद, बजरंग दल च्या वतीने कर्नाटकातील  शिवमोगा च्या घटनेचा निषेध, हर्ष च्या आत्म्याला शांती व त्याच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यासाठी  आक्रोश प्रदर्शन करण्यात आले.

हिजाब आंदोलनाची सुरुवात कर्नाटकात झाली. आणि वणव्यासारखी ती देशभर पसरली.  याच विषयाचा विरोध करणारा 26 वर्षीय बजरंग दल चा कार्यकर्ता  हर्ष ने सोशल  मीडियावर पोस्ट टाकली.   हिजाबला विरोध केल्यामुळे  कट्टरपंथीयांकडून त्याची  धारदार चाकूने हत्या करण्यात आली.

हर्ष ला न्याय मिळावा  म्हणून देशभरात अनेक सामाजिक संस्था, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल च्या माध्यमातून आक्रोश आंदोलन, निषेध मोर्चा, श्रद्धांजली अर्पण करून कॅण्डल मार्च काढण्यात आले.

नागपूर शहरातील आंदोलनकर्त्यांनी कर्नाटक सरकारच्या विरोधात पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगी नागपूर कोतवाली पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला. 200 च्या संख्येत आलेलेल्या बजरंग दल च्या कार्यकर्त्यांशी शाब्दिक  विवाद, हातापाई पोलिसांनी केली.

कार्यकर्ता गमावणे म्हणजे कुटुंबातील मुलगा, भाऊ गमावण्यासारखे आहे. त्याची झळ संघटनेला पोहोचली म्हणून त्याच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी या आंदोलनातन करत असल्याचे विदर्भ प्रांत मंत्री गोविंद शिंदे म्हणाले. स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून संविधानाने हर्षला देखील अभिव्यक्ती स्वातंत्र दिलं होतं. याची दखल घेण्यात यावी, मात्र त्याची झालेली निर्घुण हत्या हे मुद्दाम हिजाब ला तूल  देऊन सांप्रदायिक दंगल घडवण्याचे कारस्थान आहे. असे मत विदर्भ प्रांत मंत्री  शेंडे यांनी व्यक्त केले. 

विश्व हिंदू परिषदेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून प्रशासनाला सहकार्य करण्यात आले. मात्र आक्रोश व्यक्त करण्याची अनुमती प्रशासन देत नसेल तर पुढे स्थिती हाताबाहेर गेल्यास प्रशासन जबाबदार राहील असा सूचक इशारा देखील प्रांत मंत्र्यांनी केला  .

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार