अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात अखेर रिया चक्रवर्तीची सुमारे महिनाभराने सुटका झाली आहे. सुमारे महिनाभराने रिया भायखळा तुरुंगातून बाहेर पडली आहे. यावेळी भायखळा तुरुंगाबाहेर कडेकोट बंदोबस्त करण्यात आला. रिया चक्रवर्तीच्या सुटकेच्या वेळी प्रसारमाध्यमांचीही मोठी गर्दी पाहण्यास मिळाली. याआधी तीनवेळा तिचा जामीन अर्ज मिळाला आहे. रियाचा जामीन अर्ज आज मंजूर झाला आणि तिची काही वेळापूर्वीच सुटका झाली. रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती याला मात्र जामीन देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. रिया चक्रवर्तीला ८ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती आज अखेर महिनाभराने ती तुरुंगातून बाहेर आळी आहे.