सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बदलापूर हादरलं! कलिंगड विक्रीच्या आडून करायचा लहान बाळांची विक्री; कचरा टाकण्यावरून वाद, आणि उघड झालं भयानक सत्य

याप्रकरणी मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार साळवे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.

Sudarshan MH
  • Apr 5 2025 10:17AM

बदलापूर: बदलापूरमधून एक भयानक प्रकार उघडकीस आला आहे. कलिंगड विकणारा, साधारण दिसणारा मनुष्य याच कलिंगड विक्रीच्या आडून भयानक कृत्य करत होता. चक्क नवजात बाळांच्या विक्रीचा गोरखधंदा करत असल्याचे समोर आले असून बदलापूरमध्ये फॉरेस्ट विभागाने या घृणास्पद कृत्याचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार साळवे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.

बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील संबंधित इसम हा फॉरेस्ट विभागाच्या जागेवरती फळविक्रीचा कचरा टाकत होता. त्यावरूनच झालेल्या वादाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या अनुषंगाने शहानिशा करण्यासाठी त्या फळविक्रेत्याला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलावण्यात आलं. त्या तपासादरम्यान त्याचा मोबाईलही चेक करण्यात आला असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आरोपीच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सॲपवर काही नवजात बालकांचे फोटो आणि विक्री दर आढळले आणि पोलीसही हादरले. तसेच बालकांच्या विक्रीसाठी पाच ते सात लाख रुपयांपर्यंत किंमतींचा उल्लेखही त्याच्या मोबाईलमधील चॅटमध्ये सापडले.

हा एक सराईत आरोपी असून यापूर्वीही अशाच गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी त्याला अटक केली होती, अशी ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिसांनी आरोपीला अटक करत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सहा दिवसाची पोलिस कोठडीत सुनावली आहे. वन अधिकारी वैभव वाळिंबे यांच्या सतर्कतेमुळे बालकांची तस्करी उघडकीस आली असून पोलिसांचा तपास सुरू आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार