सांगली: छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मसमभाववाले नव्हते. त्यांनी हिंदवी धर्माच्या रक्षणासाठी लढा दिला, हा इतिहास आहे. आजचा इतिहास राजकारणासाठी मोडतोड करून सांगितला जात आहे. काही भाडोत्री संशोधकांकडून हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा गलबला निर्माण केला जात आहे. हिंदूंची स्वतंत्र सत्ता आणायची हा ध्यास छत्रपती शिवाजी महाराजांचा होता, अशी परखड स्पष्टोक्ती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडे गुरुजी यांनी व्यक्त येथे केली. ते सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी बोलतांना पू. संभाजीराव भिडेगुरुजी म्हणाले, की आज विधानसभेत जो राजकीय धुडगूस चालू आहे, तो शोभणारा नाही. सामान्यांचे प्रश्न सोडून जे धुडगूस घालत आहेत ते सारे देशविरोधी आहेत. एकीकडे ‘डान्सबार’वर बंदी घालायची, दुसरीकडे कुणाला कामरासारख्या प्रकरणावरून सभागृहात दंगा करायचा, हे अयोग्य आहे.