सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बजरंग दलाचे कार्यकर्ते प्रदीप सूर्यवंशी यांना सरपंच रणधीर मोरेंकडून धमकी देऊन मारहाण!

या घटनेनंतर प्रदीप सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून राधानगरी पोलीस ठाण्यात सरपंच रणधीर मोरे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Sudarshan MH
  • Mar 4 2025 12:13AM

कोल्हापूर: राधानगरी तालुक्यातील सरवडे येथील बजरंग दलाचे कार्यकर्ते प्रदीप सूर्यवंशी यांना सरपंच रणधीर मोरे यांनी ‘तुझा बजरंग दल चालणार नाही, असल्या फालतू गोष्टी घेऊन माझ्या शाळेत येऊ नकोस’, अशी धमकी देऊन मारहाण केली. यापुढे जाऊन मोरे यांनी प्रदीप सूर्यवंशी यांच्या केशकर्तनालयाच्या दुकानाची तोडफोड केली. या घटनेनंतर प्रदीप सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून राधानगरी पोलीस ठाण्यात सरपंच रणधीर मोरे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बजरंग दलाचे कार्यकर्ते प्रदीप सूर्यवंशी हे प्रत्येक वर्षी छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पाळतात, तसेच शालेय विद्यार्थ्यांकडून तो साजरा करून घेतात. या बलिदानाचे स्मरण म्हणून त्यांनी एका शाळेतील विद्यार्थ्यांचे केस कापून त्यांना शाळेत घेऊन आले होते. हे विद्यार्थी छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाचे स्मरण म्हणून अनवाणी शाळेत आले होते, हे लक्षात आल्यावर त्याचा राग मनात धरून रणधीर मोरे यांनी प्रदीप सूर्यवंशी यांना मारहाण करून त्यांचे दुकान फोडले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार