सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

क्रूरतेची परिसीमा! महाराष्ट्राला हादरवणाऱ्या संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येचे हृदय पिळवटून टाकणारे फोटो समोर

मन विचलित करणारे हे असे फोटो आहेत. किती क्रूरपणे हत्या केली गेली असेल, याचा अंदाज हे फोटो पाहिल्यानंतर येतो.

Sudarshan MH
  • Mar 3 2025 11:53PM

मुंबई: महाराष्ट्रात गेल्याकाही महिन्यांपासून बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने मोठा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले होते. या हत्येमधील आरोपी वाल्मीक कराडला अटक करण्यात आली. तसेच, अद्याप संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कृष्णा आंधळे या आरोपीचा शोध अजूनही सुरू आहे. असे असतांना आता सीआयडीने १५०० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आला असून यामध्ये ८ आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे या आरोपपत्रातून काही फोटो समोर आले आहेत, ज्यामुळे या आरोपींनी क्रौर्याची परिसीमा पार केल्याचे समोर आले आहे. हे फोटो सीआयडीच्या हाती लागलेल्या व्हिडीओतून काढण्यात आलेल्या स्क्रीनशॉट जोडण्यात आले आहेत. हे फोटो माध्यमात आल्यानंतर महाराष्ट्रामधून प्रचंड मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने १५०० पानांचे आरोपपत्र दाखल केले असून यामध्ये ८ आरोपींची नावे आहेत. यामध्ये जोडलेल्या फोटोमधून या घटनेची क्रूरता लक्षात येत असून यातील काही फोटो हे माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. पण, हत्या प्रकरणात जे फोटो समोर आले आहेत ते पाहताना अंगाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. दरम्यान, सीआयडीने आरोपपत्रात एक व्हिडीओ जोडण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, हत्या करतानाच हा लाईव्ह व्हिडीओ शेअर करण्यात आल्याचे सांगितले गेले. आरोपींच्या ‘मोकारपंथी’ या नावाच्या व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये फोटो, व्हिडीओ टाकण्यात आले. सीआयडीने हे फोटो, व्हिडीओ ताब्यात घेतले असून पुराव्यांच्या यादीमध्ये हे फोटो समाविष्ट करण्यात आले आहेत.

सीआयडीने जोडलेल्या संबंधीत व्हिडीओमध्ये सरपंच संतोष देशमुख यांना अमानुषपणे मारहाण केली जात असल्याचे दिसत आहे. तसेच, एक आरोपी संतोष देशमुख यांच्या छातीवर पाय ठेवून फोटो काढण्यात आल्याचे समोर आले आहे. तसेच, संतोष देशमुखांना मारहाण करत असतांना आरोपींच्या चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारचा पश्चाताप दिसत नाही. तसेच, एक आरोपी यावेळी सेल्फी घेत हसताना दिसत आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लोकं यामुळे संतापले आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये ६६ पुरावे तसेच, १८४ जबाब महत्त्वाचे ठरले आहेत. आरोपींनी पाईपला करदोड्याने मूठ तयार करून संतोष देशमुख यांना मारहाण केली. तसेच, यामध्ये ५ गोपनीय साक्षीदारही महत्त्वाचे ठरले. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर केज न्यायालयात १२ मार्चला पहिली सुनावणी होणार आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार