मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी संदेशाद्वारे चुकीचे आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारे विधान करत असल्याची खोटी चित्रफीत भ्रमणभाषमधील स्टेटसवर ठेवणार्या जिहादी मुख्तार नूरमहंमद सैय्यद विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तो पनवेलमधील घोट कॅम्प तळोजा येथे राहतो.
जिहादी मुख्तार नूरमहंमद सैय्यद याने तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर करून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तोंडी चुकीची धार्मिक विधाने घातली. हे लक्षात आल्यावर त्याला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले, मात्र चौकशी पूर्वीच त्याने ती चित्रफीत स्टेटसवरून काढून टाकली आणि भ्रमणभाषमधून पुसून टाकली.