सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुण्यातील लोहगाव येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाची सीमा भिंत एका थडग्यामुळे पालटावी लागली; नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात तक्रार दाखल

अचानक निर्माण झालेल्या या थडग्यामुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढली असून हे बांधकाम तातडीने हटवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

Sudarshan MH
  • Mar 1 2025 10:06AM

पुणे: पुण्यातील लोहगाव येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सीमा भिंतीलगत अचानक उभ्या राहिलेल्या एका थडग्यामुळे विमानतळाची सीमा भिंत पालटावी लागल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या मजारसाठी जागा मोकळी करण्यासाठी भिंत थोडी आत वळवण्यात आली असून त्यामुळे मुख्य रस्ता अरुंद झाला आहे. या संदर्भात नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे थडगे बेकायदेशीर असून पूर्वी येथे नव्हते, असा दावा तक्रारदाराने केला आहे.

अचानक निर्माण झालेल्या या थडग्यामुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढली असून हे बांधकाम तातडीने हटवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या रस्त्यावरून प्रतिदिन प्रवास करणार्‍या एका नागरिकाने आश्‍चर्य व्यक्त करत सांगितले की, केवळ एका रात्रीत हे थडगे उभे राहिले आणि विमानतळाची सीमा भिंत वाकवण्याइतपत मोठा पालट करण्यात आला. एवढे मोठे काम एका रात्रीत घडल्याने नागरिकांमध्येही आश्‍चर्य आणि नाराजी व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने तक्रार गांभीर्याने घेतली असून लवकरच कारवाई केली जाईल, अशी माहितीही मिळाली आहे. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार