सांगली: ‘शिवाजी विद्यापीठ’चे नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ करण्याविषयी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांनी पू. भिडे गुरुजी यांची २८ फेब्रुवारीला भेट घेऊन त्यांना सविस्तर विषय सांगितला आणि मोर्चासाठी त्यांचे आशीर्वाद घेतले.
१७ मार्चच्या मोर्चाला उपस्थित राहू आणि या मोर्चात धारकर्यांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडे गुरुजी यांनी केले आहे. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले.