सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आ. जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून चौकशी करा; ठाणे दंडाधिकारी न्यायालयाचे भाईंदर पोलीस ठाण्याला निर्देश

दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकल्यानंतर, न्यायदंडाधिकारी ठाणे यांनी भाईंदर पोलीस ठाण्याला आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Sudarshan MH
  • Feb 7 2025 8:17AM

भाईंदर: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आ. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात हिंदू टास्क फोर्सचे संस्थापक अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी प्रविष्ट केलेली फौजदारी याचिका स्वीकारतांना ठाणे न्यायदंडाधिकारी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकल्यानंतर महिमा सैनी यांनी ३ फेब्रुवारी २०२५ या दिवशी आदेश दिला आणि भाईंदर पोलीस ठाण्याला आव्हाड यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवून चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

 
ऑगस्ट २०१८ मध्ये मुंबई आतंकवादविरोधी पथकाने नालासोपारा येथून गोरक्षक वैभव राऊत यांना अटक केली आणि तिथून देशी बनावटीचे बाँब जप्त केले. या प्रकरणाचे अन्वेषण चालू असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दोन समुदायांमध्ये द्वेष निर्माण करण्याच्या उद्देशाने व्हिडिओ बनवला आणि कोणताही पुरावा न देता म्हटले की, वैभव राऊत मराठा मोर्चात बाँब फोडणार आहे. आतंकवादविरोधी पथकाने अन्वेषणाच्या वेळी किंवा आरोपपत्रात कुठेही दावा केलेला नव्हता, की वैभव राऊत मराठा मोर्चात बाँबस्फोट करणार होता. आव्हाड यांनी हे विधान केले, तेव्हा महाराष्ट्र राज्यात भाजपची सत्ता होती.
 
 
या प्रकरणी खंडेलवाल यांनी भाईंदर पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध दोन समुदायांमध्ये शत्रुत्व निर्माण केल्याविषयी तक्रार प्रविष्ट केली; परंतु पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला नाही. त्यानंतर खंडेलवाल यांनी ठाणे येथील न्यायदंडाधिकारी ५ व्या न्यायालयात फौजदारी खटला प्रविष्ट केला. तत्कालीन न्यायदंडाधिकार्‍यांनी १३.११.२०१९ या दिवशीच्या त्यांच्या आदेशानुसार निर्णय दिला की, आव्हाड यांनी दिलेले विधान प्रथमदर्शनी भारतीय दंड संहितेच्या कलम १५३(अ) आणि ५०५(२) अंतर्गत दखलपात्र गुन्हा आहे; परंतु अधिकारक्षेत्राच्या आधारावर दंडाधिकार्‍यांनी गुन्हा नोंदवण्याचे निर्देश देण्यास नकार दिला होता.
 
खंडेलवाल यांनी १३.११.२०१९ या दिवशीच्या न्यायिक दंडाधिकार्‍यांच्या आदेशाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी याचिका क्रमांक १ मध्ये अपील केले. त्याला आव्हान देण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाने ६.९.२०२४ या दिवशीच्या आदेशात खंडेलवाल यांची याचिका स्वीकारतांना न्यायदंडाधिकार्‍यांचा आदेश बाजूला ठेवला आणि जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध खंडेलवाल यांच्या गुन्हा नोंदवण्याच्या मागणीवर पुन्हा सुनावणी करण्याचे आदेश न्यायदंडाधिकार्‍यांना दिले. दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकल्यानंतर, न्यायदंडाधिकारी ठाणे यांनी भाईंदर पोलीस ठाण्याला आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार