सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयीची माहिती आता पाठ्यपुस्तकात - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (गोवा)

गोवा विधानसभा अधिवेशनात भाजपचे आमदार कृष्णा साळकर यांनी विचारलेल्या एका प्रश्‍नाला लेखी उत्तरादाखल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली.

Sudarshan MH
  • Mar 25 2025 11:42AM

पणजी: छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित माहिती असलेले धडे आता पाठ्यपुस्तकात समाविष्ट केले जाणार आहेत. त्यांच्या शौर्याची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षणमंत्रीपद सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. गोवा विधानसभा अधिवेशनात भाजपचे आमदार कृष्णा साळकर यांनी विचारलेल्या एका प्रश्‍नाला लेखी उत्तरादाखल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली.

 
यावेळी बोलतांना ते म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित धडे इयत्ता ४ थी आणि इयत्ता ७ वीमध्ये समाविष्ट केले जाणार आहेत. गोव्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची कार्यवाही चालू झालेली आहे. गोव्यात राष्ट्रीय शैक्षणिक, संशोधन आणि प्रशिक्षण मंडळाची (एन्.सी.ई.आर्.टी.ची) पाठ्यपुस्तके लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. इयत्ता पहिली, दुसरी, तिसरी आणि सहावी यांसाठी ही पुस्तके लागू करण्यात आलेली आहेत. उर्वरित इयत्ता चौथी, पाचवी, सातवी, आठवी, नववी आणि दहावी यांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक, संशोधन आणि प्रशिक्षण मंडळाची पाठ्यपुस्तके लागू होणार आहेत. ही पुस्तके अजून आलेली नाहीत. ही पुस्तके आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह देशासाठी मोठे योगदान दिलेले राष्ट्रपुरुष यांचे धडे अभ्यासक्रमात समाविष्ट केले जाणार आहेत. सध्या मराठीमध्ये ‘खंडोजींचे कर्तव्यपालन’ आणि इंग्रजीत ‘मराठा’ हे धडे अभ्यासक्रमात आहेत.’’

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार