राज कुंद्राच्या अडचणीत वाढ मुंबई क्राईम ब्रांचने SIT टीम बनवली
पोर्नोग्राफी प्रकरणामध्ये पोलिसांनी अटक केल्यापासून राज कुंद्राबाबत अनेक खुलासे होतं आहेत. त्यामुळे या प्रकरणाला एक गंभीर वळण लागलं आहे.
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा(Shilpa Shetty) पती आणि उद्योजक राज कुंद्रा (Raj Kundra Pornography Case) चांगलाच अडचणीत आला आहे. दिवसेंदिवस त्याच्या अडचणीत वाढ होतं चालली आहे. पोर्नोग्राफी प्रकरणामध्ये पोलिसांनी अटक केल्यापासून राज कुंद्राबाबत अनेक खुलासे होतं आहेत. त्यामुळे या प्रकरणाला एक गंभीर वळण लागलं आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणामध्ये आपल्याकडे राज कुंद्राविरुद्ध सबळ पुरावे असल्याचंदेखील म्हटलं आहे. हे प्रकरण सध्या खूपच गंभीर बनलं आहे. त्यामुळे या प्रकरणातील सर्व पाळेमुळे खणून काढण्यासाठी मुंबई क्राईम ब्रांचने SIT टीम बनवली
पोर्नोग्राफी प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी बनवलेल्या SIT टीमचा हेड एसपी लेव्हलचा अधिकारी असणार आहे. हा अधिकारीचं या टीमचं नेतृत्व आणि मार्गदर्शन करणार आहे. ही टीम पोर्नोग्राफी प्रकरणामध्ये दाखल करण्यात आलेल्या वेगवेगळ्या प्रकरणांचा तपास करणार आहे. त्यांनतर ही टीम मुंबई क्राईम ब्रांचला रिपोर्ट देणार आहे. मुंबई क्राईम ब्रांचने असा दावा केलं आहे की हे प्रकरण फक्त मुंबई किंवा देशापुरत मर्यादित नाही तर अगदी विदेशापर्यंत पसरलं आहे. यामध्ये मुंबई क्राईम ब्रांचने सर्वप्रथम राज कुंद्राच्या कंपनीचं विदेशात होणारं ट्रान्झक्शन तपासलं होत. तसेच कंपनीच्या सर्व्हरमधून डाटा डिलीट केल्याचंदेखील म्हटलं होतं. या पोर्नोग्राफी प्रकरणामध्ये राज कुंद्रासोबत तब्बल 11 लोकांना अटक करण्यात आली आहे. तसेच राज कुंद्राच्या अटकेनंतर अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्सनी समोर येत राज कुंद्रावर धक्कादायक आरोप केले आहेत. शर्लिन चोप्रा, पूनम पांडेसारख्या मॉडेल्सनी मुंबई पोलिसांकडे अनेक मोठमोठे खुलासे केले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला गंभीर वळण लागलं आहे.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प