कोरोनावरील लस वितरणाच्या दृष्टीने सूक्ष्मनियोजन करा! मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे खाजगी रुग्णालयांना माहिती सादर करण्याचे आवाहन
आता लवकरच कोरोनाची लस येऊ घातली आहे. ही लस आल्यानंतर ती वितरीत करण्यासाठी केंद्र शासनातर्फे प्राधान्यक्रम ठरविला जाणार आहे. ही लस वितरीत करणे, आता आरोग्य यंत्रणेपुढील मोठे आव्हान राहणार आहे. त्यादृष्टीने तयार राहण्याचे आणि सूक्ष्मनियोजन करण्याचे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले.