प्रदूषणामुळे इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष?
इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठी आतापर्यंत २ वेळा साखळी उपोषण एकदा लाक्षणिक उपोषण, सायकल रॅली, आंदोलन, जिल्हाधिकार्यांच्या कार्यालयात बैठका, अनेक नेत्यांना निवेदने या सर्व गोष्टी करूनही २ दशके झाली, तरीही इंद्रायणी नदीचे प्रदूषण मात्र आहे तसेच आहे, असे आळंदी येथील इंद्रायणी सेवा फाऊंडेशनने सांगितले.