सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

लाडकी बहिण योजनेबद्दल खोटी माहिती पसरवणं संजय राऊतांना भोवलं; राऊत यांच्या विरोधात मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये गुन्हा दाखल

भोपाळमध्ये भाजप महिला मोर्चाच्या तक्रारीनंतर संजय राऊत विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sudarshan MH
  • Oct 10 2024 11:17AM
मुंबई: उबाठा गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मध्य प्रदेशातील भोपाळ शहरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राऊत यांनी ‘लाडकी बहिण’ योजना बंद पडल्याची खोटी अफवा पसरवली होती, ज्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील ‘लाडकी बहिण’ योजना ही महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे.
 
भोपाळमध्ये भाजप महिला मोर्चाच्या नेत्या सुभाषा चौहान यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीत राऊत यांनी समाजात खोटी माहिती पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे जनतेमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असल्याने, स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
 
चार दिवसांपूर्वी म्हणजे ७ ऑक्टोबरला सकाळच्या पत्रकार परिषद मध्य प्रदेशातील लाडकी बहिण योजना बंद पडली आहे, महाराष्ट्रातील योजना बंद पडेल असा धादांत खोटा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरंतर मध्यप्रदेशमध्ये गेल्या दोन वर्षांपासून लाडकी बहिण योजना सुरू आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार