सुशांत सिंह राजपूत प्रकणाला आता आणखी एक वेगळे वळण मिळाले आहे. याप्रकरणी आता ईडीने (Enforcement Directorate) गुन्हा दाखल केला आहे. ईडीने याप्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाशी संबधित पैशांचे जे काही व्यवहार झाले, त्यांची चौकशी ई़डीकडून केली जाणार आहे. बिहार पोलिसांच्या सुशांत मृत्यूप्रकरणातील एफआयआरच्या आधारावर मनी लाँड्रिंगची केस दाखल करण्यात आली आहे. गुरुवारी ईडीने याप्रकरणातील एफआयआर आणि इतर कागदपत्र बिहार पोलिसांकडे मागितले होते. त्याचप्रमाणे ईडीने रिया चक्रवर्ती कुटुंबाच्या दोन्ही कंपन्यांच्या बँक खात्यांची माहिती, तसंच सुशांतच्या बँक खात्यांची माहिती मागवून घेतली होती.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील आता या वादामध्ये उडी घेतली होती. या प्रकरणाची चौकशी सीबीआयने करावी असं व्यापक जनमत आहे पण राज्य सरकारची अनुत्सुकता पाहता किमान ईडीने या प्रकरणी ईसाआयआर दाखव करावी अशी मागणी फडणवीस यांनी केली होती. या प्रकरणात गैरव्यवहार आणि मनी लाॅंड्रिंग असल्याचे आढळून आल्याने याबाबत ईडीने चौकशी करावी अशी मागणी फडणवीस यांनी केली होती
आता ईडीने याप्रकरणात हस्तक्षेप केल्याने एक वेगळा ट्विस्ट याप्रकरणाला मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर एफआयआरमध्ये पैशांच्या अफरातफरीचा आरोप केला होता. रियाने सुशांतला त्याच्या कुटुंबापासून दूर केले, तिने त्याचा वापर पैशांसाठी केला असे काही गंभीर आरोप त्यांनी तिच्यावर केले आहेत. त्याचप्रमाणे सुशांतला वेडं ठरवून त्याचे पैसे लुटायचा डाव रिया आणि तिच्या कुटुंबाचा होता असा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला आहे