बॉलिवूड ड्रग्स प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या मुच्छड पानवालाला (Muchhad Paanwala) याला अंमली विरोधी पथक (NCB) ने अखेर अटक केली आहे. आधी एनसीबीने त्यांना समन्स बजावला होता. त्यानंतर आज अटकेची कारवाई केली आहे.
मुंबईतील सर्वात पॉश भागात, kems कॉर्नरवर मुच्छड पानवाल्याचं एक पानाचं दुकान आहे. बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्जाची एक्स मॅनेजर राहिला फर्निचरवाला प्रकरणात चौकशीसाठी मुच्छड पानवालाचे मालक के जयशंकर तिवारी याचे नाव समोर आले होते. त्यानंतर त्याला सोमवारी समन्स पाठवण्यात आला होता. सोमवारी दिवसभर त्याची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर रात्री उशिरा अटक करण्यात आली. त्याच्याकडूनतर काही ड्रग्सची माहिती घेण्यासाठी एनसीबीने तिवारीला अटक केली. केम्स कॉर्नरवर असलेल्या त्याच्या दुकानात मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा साठा सुद्धा सापडला होता.
दरम्यान, एनसीबीने शनिवारी एका ब्रिटिश नागरिकासह तीन लोकांना अटक केली होती. या तिघांकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे. या तिघांमध्ये ब्रिटिश नागरिक करण सजनानीसह दिया मिर्जाची एक्स मॅनेजर राहिला फर्निचरवाला आणि तिची बहिण शाईस्ता फर्निचरवाला यांचा समावेश आहे.
ब्रिटिश नागरिक करण सजनानीला एनसीबीने वांद्र्यातून ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडून अमेरिकेतून मागवण्यात आलेला, अतिशय महाग खास प्रकारचा गांजा जप्त करण्यात आला.
याआधीही एनसीबीने अनेक बॉलिवूडच्या सेलिब्रेटींना चौकशीला बोलावले होते. यामध्ये दीपिका पदुकोण, सारा खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे.तर अर्जुन रामपाललाही एनसीबीने दोन वेळा चौकशीसाठी बोलावलं होतं. त्याचबरोबर त्याच्या बहिणीला सुद्धा चौकशीला बोलावण्यात आले आहे.