भारत आणि चीन यांच्यात वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) गेल्याय 5 महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष (India-China Standoff) संपवण्यासाठी आज दोन्ही देशांचे कोअर कमांडर पुन्हा भेटणार आहेत. दोन्ही देशांच्या मुख्य कमांडर यांच्यातली ही सातवी बैठक आहे. गेल्या बैठकीत दोन्ही देशांनी एलएसीवर (India-China LAC Rift) अधिक सैन्य तैनात न करण्याबाबत सहमती दर्शविली, मात्र असे असले तरी संघर्षाची परिस्थिती अजूनही कायम आहे. दोन्ही देशांच्या कॉर्प कमांडर स्तराची (corp commanders meeting) सातवी बैठक चुशूलमध्ये आज होणार आहे. पहिल्यांदाच चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारीही या बैठकीला हजर आहेत. त्याचबरोबर भारताने वरिष्ठ मुत्सद्दी सहसचिव (पूर्व आशिया) नवीन श्रीवास्तव यांना लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग यांच्यासोबत राहणार आहेत.
भारत आज होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत लद्दाखमधील संघर्षाच्या मुद्द्यांवरून चीनकडे सैन्य पूर्णपणे मागे घेण्याची मागणी करेल. लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेच्या (एलएसी) चुशूल येथे दुपारी 12 वाजता ही बैठक सुरू होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पूर्व लडाखमधील सर्व संघर्ष बिंदूंमधून सैन्य मागे घेण्याचा रोडमॅप तयार करण्याचा या बैठकीचा उद्देश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लेहमध्ये असलेल्या 14 व्या कॉर्पचे कमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग 'फायर अँड फ्युरी' ही अखेरची बैठक होईल. 14 ऑक्टोबरपासून त्यांची जागा लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन घेतील. हरिंदरसिंग यांची त्यांच्या कॉर्प कमांडर लेव्हलची मुदत संपुष्टात आली असून आता त्यांची देहरादूनच्या आयएमए (इंडियन मिलिटरी Academyकॅडमी) चे कमांडर म्हणून नेमणूक झाली आहे. सोमवारी होणाऱ्या बैठकीत लेफ्टनंट जनरल मेनन हे भारतीय प्रतिनिधीमंडळातही उपस्थित असतील