सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

रियाने स्वतःहून चौकशीसाठी हजर राहण्याचे एनसीबीच्या अधिकाऱ्यांना सांगितले

रिया निरपराध असल्याचा वकिलांनी केला पुनरुच्चार

Aishwarya Dubey
  • Sep 6 2020 7:52PM

रिया चक्रवर्ती अटकेसाठी तयार असल्याचे रियाचे वकील अॅड. सतीश मानेशिंदे यांनी म्हटलं आहे. आज (रविवारी) सकाळी रियाच्या घरी नोर्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो (एनसीबी) मुंबई पोलिसांसह दाखल झाली होती. यावेळी एनसीबीनं तिला समन्स बजावलं आणि स्वतःहून चौकशीसाठी येण्याचा किंवा आत्ता पोलिसांसोबत येण्याचा पर्याय तिच्यासमोर ठेवला. त्यानंतर रियाने स्वतःहून चौकशीसाठी हजर राहण्याचे एनसीबीच्या अधिकाऱ्यांना सांगितले. या पार्श्वभूमीवर रियाच्या वकिलांनी ही माहिती दिली. दरम्यान, रिया एनसीबीच्या कार्यालयात हजर झाली आहे.

 

रियाचे वकिल अॅड. मानेशिंदे म्हणाले,”जर हे प्रकरण जादूटोण्याचं असेल तर रिया चक्रवर्ती अटकेसाठी तयार आहे. प्रेम करणं हा गुन्हा असेल तर ती याचे सर्व परिणाम भोगायला तयार आहे. बिहार पोलिसांनी सीबीआय, ईडी आणि एनसीबीच्या मदतीने दाखल केलेल्या खोट्या केसेसविरोधात  निरपराध असल्यानेच रियाने कुठल्याही कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केलेला नाही.”

 

एनसीबीने रियाला सकाळी घरी जाऊन समन्स बजावल्यानंतर रिया एनसीबी समोर चौकशीसाठी हजर होण्याकरिता घरातून आपल्या कारने बाहेर पडली. त्यानंतर अॅड. मानेशिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. मानेशिंदे यांच्या विधानावरुन रियाला चौकशीदरम्यान अटक होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

 

दरम्यान, एनसीबीचे उपसंचालक अमित घावटे म्हणाले होते की, “रिया इथे चौकशीसाठी येणार आहे. या ठिकाणी तिच्याकडे केवळ चौकशी केली जाणार आहे. यानंतर जे काही समोर येईल त्याची माहिती माध्यमांना दिली जाईल.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार