सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

टाळेबंदीमुळे दुबईत अडकून पडलेल्या कोकणवासीय तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांना खास विमानाने मायदेशी कोकणात पाठवण्याची व्यवस्था

गेल्या मंगळवारी दुबईहून मुंबईला आलेल्या या विमानात एकूण १३० प्रवासी होते.

Aishwarya Dubey
  • Jul 17 2020 10:51AM

टाळेबंदीमुळे दुबईत अडकून पडलेल्या कोकणवासीय तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांना खास विमानाने मायदेशी कोकणात पाठवण्याची व्यवस्था कोकणातील तरुणांनी एकत्र येत केली आहे.  गेल्या मंगळवारी दुबईहून मुंबईला आलेल्या या विमानात एकूण १३० प्रवासी होते. यामध्ये २० गरोदर महिलांचा देखील समावेश आहे.

दुबई, सौदी अरेबियामध्ये कोकणी लोक मोठय़ा संख्यने नोकरीवर आहेत. काहीजण सहकुटुंब आहेत. करोना महामारीने आखाती देशाला यावेळी जबरदस्त विळखा घातला आणि त्याठिकाणी देखील टाळेबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या.हजारो तरूण चार महिने घरी बसून आहेत. पर्यटन आणि ‘व्हिजिट व्हिसा’वर गेलेल्यांचे मुदत संपल्याने आणखी हाल झाले होते.

दुबईत कार्यरत असलेले कोकणी तरुण ‘युनायटेड कोकण टीम’ या नावाने तेथे विविध उपक्रम करतात. टाळेबंदीच्या काळात त्यांनी दुबईमध्ये असलेल्या अनेक कोकणी तरुणांना तसेच कुटुंबांना मदतीचा हात दिला होता. याच चमूने पुढाकार घेऊन परदेशात अडकलेल्या कोकणवासियांना गावाकडे पाठवण्याची व्यवस्था केली. त्यासाठी केंद्र आणि महाराष्ट्र सरकार, दुबईतील भारतीय दूतावास आणि दुबई सरकार यांच्याशी संपर्क साधून आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या. खेडचे मुख्तार पालेकर, चिपळूणचे दिलावर दलवाई, खालिद मुकादम, सबिना शेख, नजीर शेख, जुनेद शेख इत्यादींनी कोकणातून समन्वय करण्यात महत्वाची भूमिका बजावली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार