सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पनामा पेपर लिक प्रकरणी सुनेवरील आरोपांवर जेव्हा अमिताभ बच्चन यांनी केला होता खुलासा

ईडीने ऐश्वर्याला या प्रकरणातील चौकशीसाठी समन्स बजावलं होतं.

Sudarshan MH
  • Dec 21 2021 12:53PM

पनामा पेपर लीकप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची चौकशी केली. याप्रकरणी आतापर्यंत अनेक जागतिक नेत्यांची, उद्योगपतींची आणि सेलिब्रेटींची नावे समोर आली होती. या सर्वांवर काळा पैसा परदेशात लपवून ठेवल्याचा आणि करचोरी केल्याचा आरोप आहे. या पनामा पेपर लीकप्रकरणी ऐश्वर्या बच्चनच्याही नावाचा समावेश आहे. याप्रकरणी ईडीने ऐश्वर्या रायची तब्बल ५ तास चौकशी केली. दरम्यान या प्रकरणी ऐश्वर्या रायचे पती अभिषेक बच्चन आणि सासरे अमिताभ बच्चन यांचेही नाव आहे. त्या दोघांनीही याबाबत अनेकदा स्पष्टीकरण दिले आहे.

पनामा पेपर लिकप्रकरणी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची काल (२० डिसेंबर) तब्बल ५ तास ईडी चौकशी झाली. बेकायदेशीर आर्थिक व्यवहार प्रकरणी दाखल गुन्ह्यात ही चौकशी करण्यात आली. ईडीने ऐश्वर्याला या प्रकरणातील चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. यानंतर ऐश्वर्या स्वतः चौकशीसाठी दिल्लीतील ईडी कार्यालयात दाखल झाली होती. या ठिकाणीच तिची चौकशी झाली. यावेळी ऐश्वर्यांला ईडीच्या अनेक प्रश्नांचा सामना करावा लागला

दरम्यान लीक झालेल्या पनामा पेपर्सवरुन उघड झाले आहे की, काळा पैसा लपवण्यासाठी ऐश्वर्याने कथित ब्रिटीश व्हर्जिन आयलंडमध्ये २००५ मध्ये अमिक पार्टनर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक बनावट कंपनी सुरु होती होती. या कंपनीची संचालक असल्याचे तिने सांगितले होते. यात फक्त ऐश्वर्या नाही तर तिचे वडील, आई आणि भाऊ देखील या कंपनीत डायरेक्टर होते

या कंपनीचे प्रारंभिक पेड-अप भांडवल ५० हजार डॉलर्स होते. या प्रत्येक शेअरची किंमत १ डॉलर इतकी होती आणि सर्व संचालकांकडे 12 हजार 500 शेअर्स होते. या बनावट कंपनीच्या माध्यमातून तिने काळा पैसा देशाबाहेर पाठवला, असा आरोप तिच्यावर आहे. दरम्यान २००८ मध्ये या कंपनीने अचानक काम बंद केले, अशी माहिती समोर आली आहे.

पनामा पेपर्स प्रकरणात बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांचेही नाव समोर आले होते. परदेशात काळा पैसा लपवण्यासाठी अमिताभ बच्चन यांना चार कंपन्यांचे संचालक असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले होते. यातील तीन कंपन्या बहामासमध्ये होत्या. तर एक कंपनी ब्रिटिश व्हर्जिन आयलंडमध्ये नोंदणीकृत होती. या कंपन्यांची स्थापना १९९३ दरम्यान करण्यात आली होती. पनामा पेपर्समध्ये असे सांगण्यात आले आहे की, या बनावट कंपन्यांचे भांडवल काही हजार डॉलर्स होते. पण त्यांचा व्यवसाय हा लाखो डॉलर्सचा होता. याप्रकरणी ईडीने अभिषेक बच्चनचीही चौकशी केली होती.

 



सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार