सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

‘४८ तासात जाहीर माफी मागा, अन्यथा…,’ -संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस

संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

Aishwarya Dubey
  • Aug 12 2020 10:45AM

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी सध्या अनेक आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील या प्रकरणावर भाष्य करताना अनेक दावे केले आहेत. नुकतंच संजय राऊत यांनी सुशांतच्या वडिलांनी दोन लग्न केलं असून त्यांचं दुसरं लग्न सुशांतला मान्य नव्हतं असा दावा केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत सुशांतच्या चुलत भावाने संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. टाइम्स नाऊने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

वृत्तानुसार, सुशांतचा चुलत भाऊ नीरज कुमार याने संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. नीरजने संजय राऊत यांना ४८ तासात जाहीर माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाईला तयार राहा असं नोटीसमध्ये म्हटलं आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?
संजय राऊत यांनी दावा केला होता की, सुशांत सिंह राजपूत आणि त्याचे वडिल के. के. सिंह यांच्यातील नातं फारसं चांगलं नव्हतं. संजय राऊत यांनी सामनामधून लेखातून हा दावा केला होता.

संजय राऊत यांनी दावा होता आहे की, सुशांत आपल्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नामुळे खूश नव्हता. सुशांत सिंह राजपूत किती वेळा आपल्या वडिलांची भेट घेण्यासाठी पाटण्याला गेला होता? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. “सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमागील सत्य बाहेर येऊ नये म्हणून यावर राजकारण करण्यात आलं आणि मुंबई पोलिसांकडून हे प्रकरण काढून घेण्यात आलं,” असा आरोपही त्यांनी केला होता. सुशांतच्या कुटुबीयांकडून मात्र हे सर्व आरोप फेटाळण्यात आले होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार