भाऊ महाराज फुरसुंगीकर यांची ॐ काली हिंदवी स्वराज्य सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आदरणीय कालीपुत्र कालीचरण महाराज यांनी नियुक्तीची घोषणा केली. श्री.भाऊ महाराज फुरसुंगीकर हे अनेक वर्षांपासून सामाजिक, अध्यात्मिक क्षेत्रात काम करत आहेत, सामाजिक कामात त्यांनी स्वतःला पुर्णपणे वाहून दिले आहे. दिनांक 26 नोव्हेंबर रोजी एकादशीच्या शुभ मुहूर्तावार त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली. यावेळी श्री कालिपुत्र कालीचरण महाराज यांनी श्री भाऊ महाराजांना नियुक्ती पत्र प्रदान करून भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक मा.श्री. साळुंखे साहेब.शिवसेनेचे प्रांत सचिव ,श्री.वैभव थोरात कर्नाटक येथील श्री. स्वामी विठ्ठल महाराज,तेलंगणा येथील श्री.स्वामी करण महाराज आदि मान्यवर उपस्थित होते.
नियुक्ती नंतर ओम काली हिंदवी स्वराज्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री भाऊ महाराज फुरसुंगीकर म्हणाले, की समाज सेवा, राष्ट्र प्रेम व धर्माभिमान या त्रिसूत्रीवर आम्ही भरीव कार्य करणार आहोत. जनतेने, जनतेच्या हितासाठी व अनेक प्रश्न आणि त्या वरील उत्तर म्हणून निर्माण केलेले जन आंदोलन म्हणजे हिंदवी स्वराज्य सेना होय.
हिंदू धर्माच्या रक्षणासाठी व अखंड भारताच्या संकल्पपूर्ती साठी आम्ही अखंड भारत एकसंध एक कणखर व मजबूत बनवण्यासाठी उत्तम पर्याय म्हणून ओम काली हिंदवी स्वराज्य सेनेच्या कार्यास संपूर्ण हिंदुस्थानात वाढवण्यासाठी कटीबद्ध राहू.
या नवीन नियुक्ती साठी श्री भाऊ महाराज फुरसुंगीकर यांच्यावर वेगवेगळ्या सामाजिक स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यावेळी श्री. भाऊ महाराज यांनी देशातील तरुण युवकांना राष्ट्र कार्य करण्यासाठी ओम काली हिंदवी स्वराज्य सेनेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन केले आहे.