मुंबई: मंत्रालयातील सुरक्षा अधिक भक्कम करून बाहेरून येणाऱ्यांची गर्दी कमी करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच आधारप्रमाणे कामासाठी युनिक आयडेंटिफिकेशन सुरू करणार आहोत. त्यामुळे एका कामासाठी दोन बिले निघणार नाहीत. एक युनिक आयडी तयार केला जाणार असून, त्यामुळे कामात पारदर्शकता येईल. सरकारची मालमत्ता किती हे सुद्धा समजणार आहे.
विशेष म्हणजे आता ई फायलिंगही करण्यात येणार असून, आयटी जगात कॅबिनेट फाईल ई - मूव्हमेंट होणार आहे. यासह मंत्रालयातील सुरक्षा अधिक भक्कम करण्यात येणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येकाची ओळख ही युनिक आयडी प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासन आणि सी 60 यांच्या समन्वयामुळे हे परिवर्तन होतंय. मंत्रालयातील गर्दी कमी करण्यापेक्षा सुरक्षा वाढवण्यासाठी आलेल्या प्रत्येक माणसाची ओळख पटली पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाला नोंदणी करावी लागेल. 'कृत्रिम बुद्धिमत्तेचा’ उपयोग करून मंत्रालयातील सुरक्षा भक्कम करण्यावर आमचा प्रयत्न आहे. तसेच मंत्रालयात कोण किती वेळा येतो, यावरही नजर असणार आहे.