सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोल्हापूरमध्ये बांगलादेशी घुसखोरांना आळा घालण्यासाठी शिंगणापूर ग्रामपंचायतीचा ठराव

काही लोकांनी सामाजिक माध्यमांवर चुकीच्या पद्धतीने ठरावाचा प्रचार केल्याचे उघड झाले होते.

Sudarshan MH
  • Sep 17 2024 5:43PM

कोल्हापूर: ‘आमच्या शेजारच्या गावात मे महिन्यात २ बांगलादेशी महिला स्थानिक पत्यावर आधारकार्ड बनवून रहात असल्याचे निदर्शनास आले. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी शिंगणापूरच्या ग्रामसभेत चर्चा झाली. त्या अनुशंगाने बांगलादेशी घुसखोरांना आळा घालण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शिंगणापूर ग्रामपंचायतीचा ठराव करण्यात आला. या ठरावात ‘बांगलादेशी घुसखोर आढळल्यास त्यांना मतदानाचा अधिकार देण्यात येऊ नये’, असे नमूद केले होते. असे असतांना काही लोकांनी सामाजिक माध्यमांवर चुकीच्या पद्धतीने जो ठराव सगळीकडे प्रसारित झाला, त्याविषयी सरपंच म्हणून मी दिलगिरी व्यक्त करते. कोणत्याही समाजाला न्यून लेखण्याचा आमचा हेतू नाही’, असे शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच रसिका पाटील यांनी प्रसिद्धीमाध्यमांना सांगितले.

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या २८ ऑगस्ट २०२४ च्या सभेत करण्यात आलेल्या एका ठरावाचे पत्र १५ सप्टेंबरला सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित झाले. ‘मौजै शिंगणापूर गावच्या सीमेतील नवीन मतदार नोंदणी करतेवेळी नवीन येणार्‍या अल्पसंख्यांक (मुसलमान) यांची नवीन मतदान नोंदणीत नावे समाविष्ट करण्यात येऊ नयेत’, असे सर्वानुमते ठरले. ज्या वेळी नवीन मतदारसूची प्रसिद्ध होईल, तेव्हा नवीन अल्पसंख्यांक (मुस्लिम) यांची नोंद झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर ग्रामपंचायतीच्या वतीने हरकती घेऊन सदरची नावे अल्प करण्यात यावीत, असेही सर्वानुमते ठरले असून त्याच गावसभा सर्वानुमते संमती देत आहे.’ असे लिखाण सामाजिक माध्यमांवर प्रसारित झालेल्या ठरावात होते.

या संदर्भात तेथील ग्रामसेवकांनी सांगितले की, सामाजिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेली प्रत कुणालाही देण्यात आलेली नाही. ठरावाची नक्कल सिद्ध झाल्यावर आणि त्यावर स्वाक्षरी केल्यावर त्यातील चूक लक्षात आल्यावर ती कार्यालयात ठेवण्यात आली. हे पत्र प्रसारित झाल्यावर या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश जिल्हा परिषद स्तरावर गटविकास अधिकारी आणि करवीर तहसीलदार यांनी दिला आहे. या संदर्भात ‘मोहोमेडन एज्युकेश सोसायटी’ने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. यामध्ये ‘ग्रामपंचायत शिंगणापूरचे सरपंच, ग्रामसेवक आणि सदस्य यांनी मुस्लिम मतदान नोंदणी न करणे याविषयी केलेला ठराव घटनाबाह्य आणि धार्मिक तेढ निर्माण करणारा आहे. त्यामुळे सर्व संबंधितांवर फौजदारी नोंद करावी आणि ग्रामपंचायत विसर्जित करावी’, अशी मागणी करण्यात आली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार