सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

१ नोव्हेंबरपासून सातबारा उताऱ्यावर लागणार आईचेही नाव; भूमी अभिलेख विभागाने राज्य सरकारकडे पाठवला प्रस्ताव

१ नोव्हेंबर २०२४ पासून या नियमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

Sudarshan MH
  • Sep 13 2024 11:18AM

सरकारी कागदपत्रांमध्ये आईच्याही नावाचा समावेश असेल असा मोठा निर्णय राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी घेतला होता. त्यानंतर आता सातबारा उताऱ्यावरही अर्जदाराच्या नावानंतर आईचेही नाव टाकणे बंधनकारक असणार आहे. १ नोव्हेंबर २०२४ पासून या नियमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, सरकारी कागदपत्रांमध्ये व्यक्तीच्या नावासोबत आईचेही नाव बंधनकारक असेल, असा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने सहा महिन्यांपूर्वी घेतला होता.

१ मे २०२४ नंतर जन्मलेल्या बालकांच्या कागदपत्रांमध्ये वडिलांसह आईचेही नाव असेल, असे या नव्या निर्णायानुसार स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर आता सातबारा उताऱ्यावरही आईचे नाव बंधनकारक असणार आहे. १ मे २०२४ नंतर जन्माला आलेल्यांच्या नावाने जमीन खरेदी केल्यास सातबारा उताऱ्यावर अर्जदारासोबत आईचे नाव लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. येत्या १ नोव्हेंबरपासून या नव्या नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव भूमी अभिलेख विभागाने राज्य सरकारकडे पाठवला आहे. दरम्यान, सातबारा उताऱ्यावर वडिलांचे नाव बंधनकारक नसेल. तसेच पुढे यामध्ये फेरफार केल्यासही आईचे नाव लावण्यात येणार आहे.

विवाहित महिलांना पतीचे किंवा वडिलांचे नाव लावण्याची मुभा देण्यात आली आहे. दरम्यान, राज्य सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणीसाठी भूमी अभिलेख विभागाकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार या निर्णयामधील त्रुटींचा अभ्यास करुन त्यावर उपाययोजना करण्यात आल्या. आता १ नोव्हेंबरपासून या नियमाची अंमलबजावणी करण्यात येईल.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार