सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

छत्रपती संभाजीनगरमध्ये लाडकी बहिण योजनेत धक्कादायक प्रकार; १२ भावांनी महिलांचे फोटो लावून भरले अर्ज

काही दिवसांपूर्वीच साताऱ्यामधील एकाच व्यक्तीने या योजनेचे तब्बल ३० अर्ज करुन मोठा घोटाळा केल्याचे समोर आले होते.

Sudarshan MH
  • Sep 13 2024 10:29AM

छत्रपती संभाजीनगर: राज्यात सध्या महाराष्ट्र सरकारची ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ चांगलीच चर्चेत आहे. लाडकी बहीण योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. या योजनेत काही धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहे. काही दिवसांपूर्वीच साताऱ्यामधील एकाच व्यक्तीने या योजनेचे तब्बल ३० अर्ज करुन मोठा घोटाळा केल्याचे समोर आले होते.

 
अशातच आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातल्या १२ भावांनी महिलांचे फोटो लावून स्वतःचा अर्ज भरल्याचे समोर आले आहे. कन्नडच्या महिला व बालकल्याण विभागाच्या हे निदर्शनास आल्यानंतर त्या १२ जणांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातल्या १२ भावांनी महिलेचे छायाचित्र लावून स्वतःचा अर्ज भरल्याचे समोर आले आहे. कन्नडच्या महिला व बालकल्याण विभागाच्या हे निदर्शनास आल्यानंतर त्या १२ जणांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आणखी काही पुरुषांनी असे अर्ज केल्याचा अंदाज वर्तवण्यात आहे. त्याची सखोल चौकशी सध्या सुरु आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र महिलांना देण्यासाठी राज्य शासनाने या योजनेला ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात या योजनेतंर्गत आतापर्यंत ९२ हजार ९८ अर्ज भरण्यात आले आहेत. त्या अर्जाची ३० ऑगस्ट रोजी पडताळणी केल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ज्यामध्ये १२ भावांनी स्वतःच्या नावाने संबंधित पोर्टलवर अर्ज दाखल केल्याचे निदर्शनास आले. या तरुणांनी आधार कार्ड ही स्वतःच्याच नावाचा अपलोड केला, तसेच हमीपत्र ही स्वतःच्याच नावाने भरून दिला, फक्त पोर्टलवर फोटो मात्र अन्य महिलांचे अपलोड केले. या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच साताऱ्यातील एका तरुणाने ही पत्नीच्या नावाने तब्बल ३० अर्ज भरल्याचे प्रकरण समोर आले होते. त्यामुळे आता या योजनेच्या अंमलबजवाणी दरम्यान होणारे गैरप्रकार लक्षात घेता राज्य सरकारने कडक नियम करण्याची मागणी केली जात आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार