पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अटल बोगद्याचे उद्घाटन करणार आहेत. हिमालयाचे दुर्गम पर्वरांगांमधील पहाड खोदून निर्माण करण्यात आलेला हा बोगदा ३,०६० मीटर उंचीवर आहे. बा बोगदा सुरू झाल्यानंतर हिमाचल प्रदेशातील बर्फवृष्टीमुळे देशापासून संपर्क तुटणारे सर्व भाग संपूर्ण वर्षभर जोडले जाणार आहेत. या बोगद्यामुळे मनाली आणि लेहचे अंतर कमी होणार आहे. आता रोहतंग पासद्वारे मनालीहून लेहला जाण्यासाठी ४७४ किलोमीटरचे अंतर कापावे लागते. अटल बोगद्यामुळे हे अंतर ४२८ किलोमीटर इतके राहणार आहे. या बोगद्यामध्ये कटिंग एज तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
मनाली-लेह हायवेवर रोहतंग, बारालचा, लुंगालाचा ला आणि टालंग ला असे पास आहेत. या भागात मोठी बर्फवृष्टी होत असल्यामुळे हिवाळ्यात येथे पोहोचणे अतिशय कठीण असते. या पूर्वी मनालीहून सिस्सूला पोहोचण्यासाठी ५ ते ६ तास लागतात, आता हे अंतर केवळ एका तासात पार होणार आहे. हा बोगदा बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने (BRO) तयार केला आहे.
अटल बोगद्यात ४०० मीटरसाठी वेगमर्यादा ताशी ४० किलोमीटर निश्चित करण्यात आली आहे. उर्वरित अंतरासाठी गाडी ताशी ८० किलोमीटरच्या वेगाने धावू शकणार आहे. या बोगद्याच्या दोन्ही टोकांवर एंट्री बॅरियर्स लावण्यात येणार आहेत. दर १५० किमीवर एमर्जन्सी कम्युनिकेशनसाठी टेलिफोन
अटल बोगद्यात दर ६० मीटरपर्यंत फायर हायड्रेंट मॅकॅनिझम उपलब्ध आहे. आग लागल्यास कमीत कमी वेळात आगीवर नियंत्रण मिळावे हा त्यामागील उद्देश आहे. दर २५० मीटरपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे असलेले ऑटो इन्सिडेंट डिटेक्शन सिस्टम उपलब्ध आहे. दर किलोमीटरच्या अंतरावर हवेचे मॉनिटरिंग देखील होणार आहे. तसेच, दर २५ मीटरवर एग्झिट आणि इव्हॅक्युशनच्या खुणाही दिसणार आहेत. संपूर्ण बोगद्यासाठी एक ब्रॉडकास्टिंग सिस्टम तयार करण्यात आली आहे.