आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले विर योध्दा संघटनेच्या वतीने आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी
नेहमीच सामजिक कार्यात हिरिरीने सहभाग घेणाऱ्याविर योध्दा संघटनेच्या वतीने नुकतेचआदिवासी बांधवांसोबत तब्बल साडे सातशे किलोमीटर अंतरपार करून गडचिरोली जिल्ह्यातीलभामरागड तालुक्यातील कोटी येथे आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली.
नेहमीच सामजिक कार्यात हिरिरीने सहभाग घेणाऱ्याविर योध्दा संघटनेच्या वतीने नुकतेच आदिवासी बांधवांसोबत तब्बल साडे सातशे किलोमीटर अंतरपार करून गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील कोटी येथे
आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. या आगळ्या वेगळ्या उपक्रमात संघटनेच्या वतीने लहान मुलांना कपडे, स्त्रियांना साड्या, वृद्धांना ब्लँकेट, दिवाळीचा फराळ त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह गरजेच्या वस्तू दिल्यामुळे आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यातील कोटी येथे राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल वीर योद्धा संघटनेचे कौतुक करून केंद्र कोटी येथेल प्रभारी पोलीस उपनिरीक्षक संजय झराड, सीआरपीएफ असिस्टंट श्री रिजेश राज,एस आर पी एफ चे पान पाटील, पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे, पोलिस उपनिरीक्षक झिंजूरडे, पोलिस उपनिरीक्षक निलेशकुमार वाघ यांनी आभार मानले यावेळी विर योद्धा संघटना प्रमुख गोरक्षक श्रीकांत रांजणकर यांच्या सोबत उपस्थित विर योद्धा कामगार संघाचे महाराष्ट्र प्रमुख नितीन मोहनाळे कामगार संघ लातूर जिल्हा प्रमुख बाळासाहेब खोसे संघटनेचे मार्गदर्शन ऍड सचिन सोनटक्के, प्रकाश खानापुरे, सचिन सरवदे, लातूर कार्याध्यक्ष पांडुरंग क्षीरसागर यांच्या वतीने सर्व कोठी पोलिस बांधवांचे व कोठी येथील ८०० ग्राम बांधवांचे आभार मानून सर्वांसोबत दिवाळीच्या फराळाचा अस्वाद घेतला.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प