सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

लातूर शहरातील मारवाडी स्मशानभूमीत वीर योद्धा संघटनेच्या मदतीने भावाच्या बेवारस मृतदेहाला बहिणीने दिला मुखाग्नी.

या जगात रडायला सुद्धा पैसे लागतात - गोरक्षक श्रीकांत रांजणकर

S.n.ranjankar
  • Dec 25 2021 3:48PM
काल एक प्रसंग गोरक्षक श्रीकांत रांजणकर यांच्या पुढे उभा टाकला  पोलीस स्टेशन मधून फोन आला एक बेवारस प्रेत आहे त्याचा अंत्यविधी करायचा आहे. ठरल्याप्रमाणे सिव्हिल हॉस्पिटल येथे बेवारस प्रेताची बॉडी घेण्यासाठी ते गेले पण तेथे काय बघायला भेटले एक वय वृद्ध (70)वर्षीय महिला एक वय वृद्ध पुरुष (75) वर्षीय  आणि त्यांची सुन यांची  भेट झाली हि लोक त्या बेवारस प्रेताचे नातेवाईक होते.तो बेवारस निधन पावलेला माणूस मूळचा कुर्डुवाडी या गावचा आई वडील लहानपणीच वारले पुढे एक बहीण दोन भाऊ आणि बहिण दोन्हि भावात मोठी आई वडील वारले त्यावेळी 7-8 वर्षाची यांना लातूर पाच नं चौक येथे राहत आसलेल्या त्यांच्या मावशीने आणले काही वर्षांनी बहिणीचे लग्न झाले बुधोडा या गावी बहिणीला देण्यात आले.काही दिवसात मावशीही मरण पावली लहानपणीच आई-वडील वारले परत जिने आसरा दिला तेही सोडून गेली हे दोघे भाऊ भंगार वेचून जगु लागले पाठीमागे कोणताच नातेवाईक नसल्याने भंगार वेचन्याच्या संगतीला लागल्यामुळे व्यसनाची संगत लागली. दोन्ही भावाला बहिणीने खुपदा समजून सांगितले पण व्यसनाची संगत लागल्याने बहिणीचे काही ऐकले नाही बहिणीची परिस्थिती अशी काम करावं तर चूल पेटेल नवरा भोळसर स्वतःच्या डोक्यावर दोन लेकराचं ओझ त्यातला बारका भाऊ म्हणजे दिनेश जिवन रिकीबे चार वर्ष अगोदरच मरण पावला लातूर येथेच आणि हा पण मरण पावला काल राहुल जिवन रिकीबे वरील जे दोन वयोवृद्ध होते सिव्हिल हॉस्पिटल येथे आलेले ते यांच्या बहिणीचे एक चुलत सासरे आणि सासू होती पिढ्यानपिढ्या देवानं दारिद्र्य पदरात घातलेलं बहिणीला भावावर मया होती भावाने बहिणीचा ऐकलं नाही ज्यावेळेस आम्ही ते प्रेत बाहेर आणलं AMBULANCE मध्ये ठेवत होतो त्यावेळी ते प्रेत बघून बहिण ढसढसा रडायला लागली पण करते काय भावाचं प्रेत घरी न्यावा म्हटलं घर नाही. स्वतः आंत्य विधी करावा म्हटलं नवरा भोळसर हातात एक रुपया नाही मग रडावतरी कसं फुकट मायेला कुठे अर्थ या जगात नाईलाजाने पोलिसांना बेवारस म्हणून सांगावं लागलं रडत असलेल्या बहिणीला पाहून ते स्वतःला रडण्या वाचून रोखू नाही शकले.त्या बहिणीला धीर देत तुझे ते भाऊ गेले असले तरी आम्ही तुझे भाऊ आहोत आसा धिर त्यांनी त्या बहिणीला दिला.आणि कालच्या बेवारस प्रेतावर अंत्यविधी त्या बहिणीच्या हाताने करण्यात आला.म्हणून ते म्हणतात या जगात रडायला देखील पैसे लागतो.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार