मुंबई: राज्यभरात ग्रामपंचायतींनी बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ कामबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात ३ दिवस म्हणजेच ३१ डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत ग्रामपंचायतींचे कामकाज बंद रहाणार आहे. या आंदोलनात राज्यभरातील २७ सहस्र ९५१ ग्रामपंचायती सहभागी होणार आहेत.
‘सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना लवकरात - लवकर अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी’, अशी मागणी करत सरपंच संघटनेने कामबंद आंदोलन पुकारले आहे.