सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भारतीय जनता युवा मोर्च्या लातूर शहर जिल्हा युवा वॉरियर्स तर्फे पुरग्रस्तांना 43 हजारांची मदत सामाजिक बांधिलकी लातूरकरांचे हात सरसावले

भारतीय जनता युवा मोर्च्या लातूर शहर जिल्ह्याच्यावतीने सामाजिक बांंधिलकी लक्षात घेऊन अनेक उपक्रम राबविले जातात. त्याच धर्तीवर राज्यातील पश्‍चिम महाराष्ट्र व कोकणामध्ये पुरग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याने अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली. अनेक ठिकाणी जीवितहाणीही झाली, त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये त्यांना मदतीचा हात मिळावा. यासाठी भारतीय जनता युवा मोर्च्याचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपा युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्त्वाखाली पुरग्रस्तांंच्या मदतीसाठी अनेक ठिकाणी मदतीसाठी प्रभातफेर्‍या काढून 42520 रूपयांचा निधी जमा करण्यात आला असून हा निधी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश कार्यकारीणीकडे सुपुर्त करण्यात आला असून हा निधी मुख्यमंत्री सहाय्यत निधी विभागाकडे वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांनी राबविलेला हा सामाजिक उपक्रम इतर सामाजिक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे

s.ranjankar
  • Aug 11 2021 12:04PM
 
लातूर: भारतीय जनता युवा मोर्च्या लातूर शहर जिल्ह्याच्यावतीने सामाजिक बांंधिलकी लक्षात घेऊन अनेक उपक्रम राबविले जातात. त्याच धर्तीवर राज्यातील पश्‍चिम महाराष्ट्र व कोकणामध्ये पुरग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याने अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली. अनेक ठिकाणी जीवितहाणीही झाली, त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये त्यांना मदतीचा हात मिळावा. यासाठी भारतीय जनता युवा मोर्च्याचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपा युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्त्वाखाली पुरग्रस्तांंच्या मदतीसाठी अनेक ठिकाणी मदतीसाठी प्रभातफेर्‍या काढून 42520 रूपयांचा निधी जमा करण्यात आला असून हा निधी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश कार्यकारीणीकडे सुपुर्त करण्यात आला असून हा निधी मुख्यमंत्री सहाय्यत निधी विभागाकडे वर्ग   करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांनी राबविलेला हा सामाजिक उपक्रम इतर सामाजिक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.
भाजपा लातूर शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे व भाजपा युवा मोर्च्या शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या सुचनेनुसार पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मदतनिधी संकलनाचा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये महात्मा बसवेश्‍वर मंडलाच्यावतीने 20 हजाराचा निधी प्रभातफेरीच्या माध्यमातून जमा करण्यात आला. या कामी राजेश पवार, गजेंद्र बोकन , संतोष जाधव, आकाश पिटले, सुरज बिराजदार, सुनिल राठी, आकाश जाधव, करण सगट आदींनी परिश्रम घेतले. छत्रपती संभाजीराजे मंडल, चांडेश्‍वरच्यावतीने 8536 रूपयांचा मतदनिधी जमा करण्यात आला. याकामी शंभूराजे पवार, सचिन यादव, परमेश्‍वर आगवाने, रोहित करवंजे, आकाश आलापूरे, शिवराय सोमवंशी, मनोज बायस, अभिषेक गजगे, शुभम सपाटे, प्रसाद पुरी, आदित्य काळे, गणेश सपाटे, सद्दाम शेख आदींनी परिश्रम घेतले. सिध्देश्‍वर मंडलाच्यावतीने 5260 रूपयांचा मदतनिधीचे संकलन करण्यात आले. याकामी रवी लवटे, सागर घोडके, बाळासाहेब माने, ज्ञानेश्‍वर धनगर, प्रसाद मुक्‍ता, प्रशांत जाधव, निसार कुरेशी, लखन ठाकूर आदींनी परिश्रम घेतले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मंडळाच्यावतीने काढण्यात आलेल्या मदतनिधीतून 3260 रूपयांचा मदतनिधी जमा करण्यात आला. यासाठी किशोर शिंदे, अ‍ॅड.गणेश गोजमगुंडे, योगेश गंगणे, ईश्‍वर सातपुते, प्रेम कदम, सुधीर उपाडे, अजय बिराजदार यांनी परिश्रम घेतले. अहिल्यादेवी होळकर मंडलाच्यावतीने काढण्यात आलेल्या पुरग्रस्तासाठींच्या मदतफेरीतून 3084 रूपयांचा मदतनिधी जमा करण्यात आला असून यासाठी काकासाहेब चौगुले,  सदाशिव आबा चौगुले,कार्यालय  प्रमुख नागोराव बोरगावकर, महेश चव्हाण, अमीत पोतदार, आकाश हडपद, महेश सांळुके, गणेश तोगरे, सुरज हडपद, अनिकेत अनेराय, प्रथमेश सुर्यवंशी, विशाल कानडे, सुरज धुमाळ, रोहित गवळी, राम कुलकर्णी, किशोर जैन, सतीश ठाकूर, भगवान कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले. तर जेएसपीएम युवा वॉरियर्सच्यावतीने एक हात मदतीचा, एक उपक्रम पुरग्रस्तांच्या पुनर्वसणासाठी या उक्रमाअंतर्गत संकेत गवळी, महादेव फड, आयुष वाले यांच्या पुढाकरातून काढण्यात आलेल्या पुरग्रस्तांसाठीच्या मदतफेरीतून 2380 रूपयाच्या मदतनिधीचे संकलन करण्यात आले. अशा एकूण सहा मंडळाच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या पुरग्रस्तांसाठीच्या मदतफेरीतून 42520 रूपयांच्या मदतनिधीचे संकलन करण्यात आले असून हा निधी भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यकरीणीकडे सुपुर्द करण्यात आला. त्यांनी राबविलेला हा सामाजिक उपक्रम इतर सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांसाठी प्रेरणादाय ठरणारा आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार