सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

लॉकडाऊन लावणार की नाही, ८ दिवसांचा अल्टिमेटम.....* मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणासाठी लॉकडाऊन लावणार की नाही याबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला लॉक डाऊन बाबतचा ८ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.

Snehal Joshi .
  • Feb 21 2021 11:41PM

कोरोनाव्हायरस ने परत एकदा आपलं डोकं बाहेर काढणं सुरू केला आहे. संपूर्ण देशात सर्वात पहिला लोक डाऊन महाराष्ट्रात लागला होता. मिशन बिगीन अगेन नंतर परत एकदा लोक डाऊन ची स्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. अमरावती, अचलपूर येथे सात दिवसाचा लॉक डाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोना चे संकट वाढत असल्याचे दिसताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. ते म्हणाले कोविडयोद्धा होता नाही आलं तर कोविड दूत तरी होऊ नका. अमरावतीमध्ये हजाराच्या आसपास रुग्ण सापडलेत. ज्यावेळेस कोरोना टोकावर होता तेव्हाही अशी स्थिती नव्हती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं. 

महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणासाठी लॉकडाऊन लावणार की नाही याबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला लॉक डाऊन बाबतचा ८ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.  “नागरिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठीचे नियम पाळले नाही आणि संसर्गाचं प्रमाण असंच सुरु राहिल्यास आपल्याला राज्यात लॉकडाऊन करावा लागेल,” असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.

लॉकडाऊन लावायचा की नाही याचं उत्तर मी तुम्हाला देणार नाही तर तुम्हीच मला द्या असंही मुख्यमंत्री म्हणाले. पुढचे 8 दिवस त्यासाठी महत्वाचे असल्याचही मुख्यमंत्र्यांनी सुचित केलं आहे. म्हणजेच महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार की नाही याचा निर्णय पुढच्या आठ दिवसात होऊ शकतो. ज्यांना लॉकडाऊन हवा आहे ते मास्कशिवाय फिरतील आणि ज्यांना तो नको आहे ते मास्क घालून फिरतील असं मुख्ममंत्री म्हणालेत. उद्धव ठाकरे म्हणाले,

“आपल्या हातात कोरोना लस आलीय, लसीकरण सुरु झालंय. 9 लाख कोविड योद्ध्यांना ही लस देण्यात आलीय. सुरुवातीला लसीबद्दल काही शंका उपस्थित झाले होते. मात्र, आज 9 लाख लसीकरण झालंय आणि त्यांना कोणताही दुष्परिणाम झाल्याचं आढळून आलेलं नाही. त्यामुळे मी राहिलेल्या कोविड योद्ध्यांना विनंती करेल की त्यांनी बेधडकपणे लसीकरण करुन घ्या. मग प्रश्न उपस्थित होतो की आम्हाला लस कधी मिळणार? तर ‘सब उपरवाले की मेहरबानी’. केंद्र सरकार ठरवतंय की कुठल्या राज्याला किती द्यायच्या. आणखी काही कंपन्यांच्या लस येतील.”

“मी नेहमी शिवनेरीवर जातो, पण यावेळी मी मुख्यमंत्री म्हणून गेलो. शिवरायांनी शत्रूशी लढण्याची जिद्द दिली, जिंकण्याची जिद्द, इर्षा दिली. वार करायचा असेल, तर तलवारीचा हल्ला झेलायचा असेल तर ढाल हवी. कोरोनाचं युद्ध लढताना आपल्या हाती ढाल नाही, पण आपल्या हाती मास्क हीच आपली ढाल असायला हवी. मास्क घालायला विसरलो, तर हा छुपा शत्रू आपल्यावर वार करु शकतो. मास्क घालणं अनिवार्य आहे. लस घेतल्यानंतर सुद्धा मास्क वापरावा,” असंही उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं. उद्धव ठाकरे म्हणाले, “कोरोना आता पुन्हा डोकं वर काढतो आहे. आपण थोडं फिरायला लागलो. लग्नावरची बंधनं अजूनही आहेत. हे उघडा ते उघडा म्हणणारे कोरोनाची शिस्त मोडू शकत नाही. समजुतदारपणे सुचनांचं पालन करा.

सगळ्यांना वाटलं कोरोना गेला, पण तसं नाहीये. कोरोनाची लाट खाली जाते, वर जाते पण खाली जाते त्याच वेळेस या लाटेला थांबवायचं असतं.”  “पाश्चिमात्य देशांमध्ये लॉकडाऊन गेल्या एक दीड महिन्यापासून आहे. ब्रिटनमध्ये तर वर्षभरापासून लॉकडाऊन आहे. संपर्काची साखळी तोडणं हाच कोरोनावरचा उपाय आहे. आपल्याला काही गोष्टी पाळाव्याच लागतील. आता ही बंधनं पुन्हा आपल्याला पाळावी लागणार आहे.

मंत्री नितीन राऊत यांनी घरचा विवाह सोहळा रद्द केला. याला म्हणतात खरी सामाजिक जाणीव. जनतेच्यावतीनं नितीन राऊत यांच्या मुलाला आशीर्वाद देतो. जर नियम मोडलेले दिसले, तर हॉलच्या मालकावर गुन्हा दाखल होईल. मास्क नाही वापरला तर दंड आकारला जाईन. आता लॉकडाऊन फक्त कागदावर, पुन्हा एकदा बंधनं पाळावे  लागणार आहेत,” असंही उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.  

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार