सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दिल्लीत १७५ बांगलादेशी पोलिसांच्या ताब्यात; उपराज्यपालांच्या आदेशानंतर दिल्ली पोलिसांची धडक कारवाई

ज्यांच्याकडे भारतीय कागदपत्रे नाहीत त्यांना ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रियेद्वारे बांगलादेशला परत पाठवण्याची तयारी सुरू असल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.

Sudarshan MH
  • Dec 23 2024 4:51PM
दिल्ली: दिल्ली उपराज्यपालांच्या आदेशानंतर, दिल्लीपोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून रोहिंग्या आणि बांगलादेशींविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत १७५ संशयित बांगलादेशींना दिल्लीबाहेरील जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, ज्यांच्याकडे भारतीय कागदपत्रे नाहीत त्यांना ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रियेद्वारे बांगलादेशला परत पाठवण्याची तयारी सुरू असल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.
 
वैध कागदपत्रांशिवाय राष्ट्रीय राजधानीत राहणाऱ्या बांगलादेशी स्थलांतरितांना ओळखण्यासाठी आणि ताब्यात घेण्यासाठी तसेच त्यांना परत पाठवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी मोहीम उघडली आहे. कोणत्याही वैध भारतीय कागदपत्राशिवाय देशात राहणाऱ्या बांगलादेशी स्थलांतरितांच्या बेकायदेशीर वास्तव्याबद्दलच्या वाढत्या चिंतेला प्रतिसाद म्हणून बाह्य जिल्हा पोलिसांनी राष्ट्रीय राजधानी दिल्ली येथे वैध कागदपत्रांशिवाय राहणाऱ्या व्यक्तींना ओळखण्यासाठी, ताब्यात घेण्याचे आणि परत पाठवण्याचे प्रयत्न वाढवले आहेत.
 
दिल्ली पोलिसांनी नुकतीच दिल्ली बाह्य जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांत विशेष मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान १७५ संशयितांची ओळख पटली असून. त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. तपासात कागदपत्रे संशयास्पद असल्याचे आढळून आली. तपासानंतर जे काही तथ्य समोर येतील. त्याआधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. दिल्लीकरांनी परिसरात कुणीही संशयित व्यक्ती आढळून आल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार