सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

माओवादी चकमकीत गडचिरोली पोलीस दलाचे वीर जवान महेश नागुलवार हुतात्मा

या चकमकीत नागुलवार यांनी दाखवलेले शौर्य आणि त्याग प्रेरणादायी आहे.

Sudarshan MH
  • Feb 12 2025 9:50AM
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलीस दलातील विशेष अभियान पथकाचे पोलीस अंमलदार महेश कवडू नागुलवार (वय - ३८ वर्षे, रा. अनकोडा, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) गंभीर जखमी झाले. घटनास्थळी लढा देत असतांना त्यांना गोळ्या लागल्या, त्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर झाली. पोलीस दलाने तत्काळ त्यांना हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढून गडचिरोलीच्या सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय उपचार सुरू असतानाच त्यांनी वीरमरण स्वीकारले. त्यांच्या शौर्यपूर्ण बलिदानामुळे संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
 
हुतात्मा पोलीस अंमलदार महेश नागुलवार यांच्या पार्थिवावर काल दि. १२ रोजी त्यांच्या मूळगावी मौजा अनकोडा, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले करण्यात आले. या अंत्ययात्रेत गडचिरोली पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा प्रशासनाचे प्रतिनिधी तसेच असंख्य नागरिक सहभागी झाले होते.
 
गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळीविरुद्ध लढणाऱ्या पोलिस दलाने अनेक वर्षांपासून कठोर संघर्ष केला आहे. या चकमकीत नागुलवार यांनी दाखवलेले शौर्य आणि त्याग प्रेरणादायी आहे. त्यांच्या बलिदानाला संपूर्ण महाराष्ट्र सलाम करतो.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार