सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अर्थमंत्र्यांचे बजेट सर्वपरी, सर्व सामाजिक घटकांना न्याय...

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केले. पक्षाच्या निवडणूक कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष दिलीप परूळेकर उपस्थित होते.

Snehal Joshi .
  • Feb 3 2022 8:59AM

पणजी 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ रोजी अर्थसंकल्प मांडला. आज २ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्प साध्या आणि सोप्या भाषेत सर्वांना समजावून सांगितला. भाजप सरकारने सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प मांडल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानतो, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केले. पक्षाच्या निवडणूक कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष दिलीप परूळेकर उपस्थित होते.

तानावडे म्हणाले, या अर्थसंकल्पात समाजातील सर्व घटकांना न्याय दिला आहे. देशाचा विकास दर ९.२७ टक्के राहील, अशा तरतुदी यात केली आहे. भाजप सरकारने आगामी पाच वर्षांत साठ लाख नव्या रोजगाराची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट या अर्थसंकल्पात ठेवले आहे. आत्मनिर्भर भारत संकल्पनेस चालना देण्यासाठी संरक्षण खात्याच्या एकूण खर्चापैकी सुमारे ६८ टक्के रक्कम देशांतर्गत उद्योगांना देऊन संरक्षण साहित्याची निर्मिती करण्यात येणार असल्याचे यावेळी तानावडे सांगितले.

२०२२-२३ मध्ये देशात ५-जी मोबाईल सेवा सुरू करण्यात येईल.पेट्रोलियम शुद्धीकरणासाठी लागणाऱ्या रसायनांवरील आयात शुल्कात घट केली आहे.
कोटी रुपये जीएसटीच्या माध्यमातू मिळाले असून काही तरतुदींमुळे  या मोबाईलसह विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होईल.
इंधन स्वस्त होईल.

जानेवारीमध्ये १ लाख ४० हजार ९८६ कोटी रुपये जीएसटीच्या माध्यमातू मिळाले असून काही तरतुदींमुळे  या मोबाईलसह विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होईल.असे तानावडे म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार